Samruddhi Expressway Accidents in 9 Months : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातांचा आलेख उंचावत असून नऊ महिन्यांत या महामार्गावर एकूण ८६० अपघात झाले आहेत. यातील ५५ अपघातात ११२ जणांचा मृत्यू झाला. तर १०९ अपघातात २७९ जण गंभीररित्या जखमी झाले. समृद्धीवर महिन्याला सरासरी ९५ हून अधिक अपघात होत असल्याचे आकडेवारी सांगते.

रविवारी पहाटे समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोल नाक्याजवळ भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची मालमोटारीला धडक बसल्याने १२ प्रवासी ठार तर २३ प्रवासी जखमी झाले. हे सर्व जण नाशिक शहर व ग्रामीण भागातील आहेत. समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून अपघातांची मालिका सुरू आहे. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी विविध पातळीवर उपाय योजना केल्याचे दावे केले जातात. परंतु, अपघातांची आकडेवारी कमी होत नसल्याचे महामार्ग पोलिसांच्या अहवालानुसार दिसून येते.

terrible accident occurred today on Samriddhi Highway in Karanja Washim district
‘समृद्धी’वरील अपघाताचे सत्र थांबता थांबेना; कारची ट्रकला धडक, चालक ठार
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
bus fire old Pune-Mumbai highway, bus caught fire,
जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बसला भीषण आग; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले
samruddhi expressway accident 25 victim families
समृद्धी महामार्ग अपघात: २५ पीडित कुटुंबांची दीड वर्षांपासून ससेहोलपट
old pune mumbai highway accident
जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर भीषण अपघात, चालक गंभीर
mumbai western railway block
मुंबई: पश्चिम रेल्वेवर चार तासांचा ब्लॉक
Water Logging due to heavy rainfall at Bhandup railway station.
Mumbai Local Train Updates : पावसामुळे १०० लोकल फेऱ्या रद्द; मेल-एक्स्प्रेस आठ तास खोळंबल्या
Mumbai Rain Update
Mumbai Rain Red Alert : मुंबईत मुसळधार पाऊस; रस्त्यांना नद्यांचं रुप, रेल्वेची उशिराने धाव, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी!

हेही वाचा : ट्रॅक्टर, दुचाकी चोरी प्रकरणात १८ संशयितांना अटक, १३ वाहने जप्त; यावल पोलिसांची कारवाई

११ डिसेंबर २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत समृद्धी महामार्गावर एकूण ८६० अपघात झाले. यातील ५५ अपघात जिवघेणे ठरले. त्यामध्ये ११२ जणांचा मृत्यू झाला. १०९ अपघात असे होते की, त्यात २७९ प्रवासी व वाहनधारक गंभीर स्वरुपात जखमी झाले. २७६ अपघातात ५०६ जणांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्या. याशिवाय ४२० अपघातात कुणी जखमी झाले नाही, असे अहवालात म्हटले आहे.