नाशिक : शहर परिसरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक उंचावत असून गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांना आव्हान देत आहेत. सोमवारी शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात एका १९ वर्षीय युवतीवर सकाळी १० वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने हल्लेखोराला ताब्यात घेतले. १९ वर्षीय तरूणीचे नातेवाईक संशयित केदार जंगम याच्याशी प्रेमसंबंध होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन ते तीन दिवसांपूर्वी युवतीला केदारचे अन्य मुलीशी संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याने या विषयावर चर्चा करण्यासाठी केदारने युवतीला हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी बोलत असतांना केदारने युवतीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. युवतीच्या ओरडण्यामुळे परिसरातील नागरिकांनी संशयिताला पकडले. त्याला मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रेमसंबंधातील वादातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

याविषयी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक संतोष नरूटे यांनी संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी मुलीला गंभीर दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले.