नाशिक : गोदावरी स्वच्छतेसाठी रामकुंड परिसरात वाहने, कपडे धुणाऱ्यांसह पात्रात कचरा, निर्माल्य टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होत नसल्याने परिस्थितीत फारशी सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. या परिसरात पोलीस व महानगरपालिकेकडून कारवाई केली जाते. उभयतांनी स्वतंत्र कारवाई न करता मनपा स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस विभागातील कर्मचारी यांचे संयुक्त पथक तयार करून नियमांचे उल्लंघन न करणाऱ्यांविरोधात कारवाईची सूचना करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाला सुरुवात होत असताना गोदावरी प्रदूषणाचा विषय पुन्हा ऐरणीवर येत आहे. उच्च न्यायालयाने गोदावरी प्रदूषणास हातभार लावणाऱ्या घटकांविरोधात कारवाईसाठी पोलीस यंत्रणेला पथक नियुक्तीचे आदेश यापूर्वीच दिले आहे. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलमांन्वये पोलीस गोदापात्रात कपडे व वाहन धुणाऱ्यांवर कारवाई करतात. जुलै २०२३ पर्यंत २०७ प्रकरणात कारवाई झाल्याची आकडेवारी पोलिसांनी मध्यंतरी गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रणाबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतखालील समितीच्या बैठकीत मांडली होती. यावेळी गोदावरीसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या प्रलंबित विषयावर चर्चा झाली. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या कायदेशीर सल्लागारांनी दिवाणी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. ही बाब प्रगतीपथावर आहे. या माध्यमातून मनुष्यबळाचा पुढील मार्ग मोकळा होण्याची यंत्रणेला अपेक्षा आहे.
हेही वाचा… प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांची उचलबांगडी, मुक्त विद्यापीठातील अक्षता कलश पूजन भोवले?
पोलीस पथक रामकुंड आणि गोदावरी पात्रालगत नियमितपणे कारवाई करते. रामकुंड परिसरात स्थानिक चौकी कार्यान्वित आहे. मनपाचे सफाई कर्मचारी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करतात. पोलीस मदतीला आल्यास संयुक्तपणे अधिक प्रभावी कारवाई होऊ शकते, याकडे मनपाच्या घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी लक्ष वेधले. पोलिसांनी समन्वयक अधिकारी नेमावा. मनपाच्या स्वच्छता विभागाच्या संचालकांशी समन्वय राखून अधूनमधून मोहीम राबविता येईल. प्रशासनाची उपस्थिती जाणवल्यानंतर नागरिकांच्या कार्यशैलीत काहीअंशी फरक पडू शकेल, असे मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सूचित केले.
एकाचवेळी दोन्ही विभागांची कारवाई
पोलीस आणि महापालिकेने स्वतंत्र कारवाई करण्याऐवजी स्वच्छता विभागाचे कर्मचारी व पोलीस विभागाचे कर्मचारी यांचे एकत्रित पथक तयार करून कारवाई करावी. रामकुंड परिसरात नियुक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी मनपाकडे दिली जाईल. मनपा स्वच्छता विभाग समन्वयक व पोलीस विभागाचे समन्वयक अधिकारी यांनी एकत्रित कारवाई करावी. दोन्ही विभागांनी समन्वयाने एकाच वेळी महापालिकेने त्यांच्या कायद्यानुसार तर पोलिसांनी त्यांच्या कायद्यानुसार कारवाई करण्याचे निश्चित झाले.
हेही वाचा… जळगाव जिल्ह्यात लाकूड तस्करी
स्वतंत्र मनुष्यबळासाठी पाठपुरावा
गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र बळ उपलब्ध होण्यासाठी आजवर अनेकदा पत्रव्यवहार झाला आहे. परंतु, या कामासाठी स्वतंत्र पदे निर्माण होत नाहीत. न्यायालयाच्या निर्देशानुसार कायमस्वरुपी पूर्णवेळ जे मनुष्यबळ द्यायला हवे, तेवढी नवीन पदे निर्माण करावी लागतील, असा प्रस्ताव पोलीस विभागाने दिला आहे. शासन स्तरावर तो मंजूर झालेला नाही. शासन स्तरावर पद निर्मितीसाठी पोलीस विभागाला मदत व्हावी म्हणून दिवाणी अर्ज दाखल करून पुढील कार्यवाहीचे नियोजन आहे.