लोकसभा निवडणूक, सण, उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोनच्या वतीने कार्यक्षेत्रात अवैध शस्त्रसाठा शोध विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या महिन्यातील गुढीपाडवा, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी हे मोठे सण, उत्सव शांततेत तसेच उत्साहात पार पडावेत, यासाठी शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> धुळ्यात बनावट मतदार ओळखपत्र तयार करणारा फोटो स्टुडिओ

या अनुषंगाने परिमंडळ दोनच्या वतीने पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर, अंबड, एमआयडीसी चौक, इंदिरा नगर, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम एक ते ३० एप्रिल या कालावधीत राबवण्यात येत आहे. यामध्ये १० वर्षातील भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल असलेल्या संशयितांच्या घराच्या झडत्या घेत चौकशी करण्यात येत असून अवैध शस्त्रसाठ्यांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. नाशिककरांनी सतर्क राहून कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर शस्त्र निदर्शनास आल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त राऊत यांनी केले आहे.