नाशिक : शहरातील उच्चभ्रु आणि मध्यवस्तीत माजी नगरसेविकेच्या घरी झालेल्या चोरीचा तपास करण्यात पोलिसांना यश आले असून तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५७ लाख, ६६ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तपासी पथकाला ७५ हजार रुपयांचे पारितोषिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जाहीर केले.

शहराच्या मध्यवस्तीतील राका कॉलनी परिसरात नवकार रेसिडेन्सी या इमारतीत डॉ. शैलेंद्र पाटील आणि माजी नगरसेविका डॉ. ममता पाटील राहतात. पाटील दाम्पत्य घरी नसताना मंगळवारी पहाटे त्यांच्या घरी चोरी झाली. सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील विविध दुकानांमधील तसेच पाच ते सहा किलोमीटरवरील सीसीटीव्ही चित्रणांची पाहणी केली. संशयित हे गंजमाळ येथील भिमवाडी भागातील असल्याचे लक्षात आले. गोरखसिंग टाक (३५), दीपक जाधव (३३), अमनसिंग टाक (३०) यांनी हा गुन्हा केल्याची खात्री झाल्यावर तपासी पथकाने सापळा रचत गोरखसिंग, दीपक आणि अमनसिंग यांना ताब्यात घेतले. संशयितांच्या ताब्यातून तीन भ्रमणध्वनी, दुचाकी, ८६६.३४० ग्रॅम सोन्याचे दागिने असा ५७ लाख,६६ हजार, २१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चोरांनी दुचाकी इंदिरानगर येथील श्री लक्ष्मी पार्क येथून चोरल्याची कबुली दिली.

nashik case filed against three individuals for causing accident by transporting iron bars
नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
nashik road jail
नाशिकरोड कारागृहातील जमिनीत दोन भ्रमणध्वनी, गुन्हा दाखल
three suspect arrested in attempted kidnapping school boy
उमराळ्यात शाळकरी मुलास पळविण्याचा प्रयत्न; तीन संशयितांना अटक
Child dies after falling into sinkhole in nashik
नाशिक : शोषखड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू
12 Crore worth of valuables seized, rural police,
नाशिक : वर्षभरात ग्रामीण पोलिसांकडून १२ कोटींचा मुद्देमाल हस्तगत, अवैध व्यवसायांविरोधात सहा हजारपेक्षा अधिक कारवाया
criminal killed at Untwadi
नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या, तीन जण ताब्यात

हेही वाचा…अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाच्या नेत्याच्या कौतुकाने

चोरांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गोरखसिंग आणि अमनसिंग हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे, नाशिकसह देशातील इतर भागात गुन्हे दाखल आहेत. तपासी पथकाने २४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलीस आयुक्तांनी ७५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.

हेही वाचा…तोरणमाळ येथे धोकादायक ठिकाणी छायाचित्र काढण्याचा मोह अनावर, अन…

सरकारवाडा पोलीस ठाणे अंतर्गत झालेल्या घरफोडीत ५७ लाखांचे दागिने आणि अमेरिकन डॉलर चोरीस गेले. स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला. अहोरात्र मेहनत घेत तांत्रिक विश्वेषण आणि अन्य माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल केली. प्राथमिक टप्प्यात गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपासात त्यांना कोणी माहिती दिली, घरापर्यंत कसे पोहचले, याची माहिती घेतली जाईल. – संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, नाशिक

Story img Loader