नाशिक: सोमवारी होणाऱ्या रक्षाबंधनासाठी जिल्हा परिसरातील टपाल कार्यालयामार्फत राखी वाटपसाठी रविवारीही टपाल कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधनासाठी राख्यांनी बाजारपेठ सजली आहे. दूरदेशी किंवा अन्य ठिकाणी असलेल्या भावा पर्यंत राखी पोहचावी, यासाठी महिलांकडून आजही ऑनलाईनच्या जमान्यात खासगी कुरियर सेवेपेक्षा टपाल विभागाच्या माध्यमातून राखी पाठविण्यास महत्व देण्यात येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नाशिककरांनी शांतता राखावी, छगन भुजबळ यांचे आवाहन

रक्षाबंधनाच्या आठवडाभर आधी दिवसाला एका कार्यालयाकडून १०० हून अधिक राख्यांचे वितरण होते. नाशिक जिल्हाचा विचार केला तर टपाल विभागाच्या ३७ वितरण विभागातून ३५० हून अधिक पोस्टमन राख्यांचे वितरण शहर तसेच जिल्हा परिसरात करत आहेत. सोमवारी रक्षाबंधन असल्याने कोणीही राखीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी रविवारीही कार्यालयीन वेळेत राखी पाकीट वितरणाची सेवा दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik postman work on sunday holiday to deliver rakhi on the occasion of rakshabandhan 2024 css