नाशिक : शहर परिसरातील वाढती गुन्हेगारी, वाहनचालकांचा बेशिस्तपणा यांना आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बुधवारी ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ४६० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. परंतु, या कारवाईतही बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांची कृपादृष्टी कायम राहिली.

शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे पोलिसांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. गुन्ह्यांसाठी चोरीच्या वाहनांचा होणारा वापर, विनानंबरच्या दुचाकींचा सोनसाखळी चोरांकडून होत असलेला वापर, यामुळे गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांपुढे समस्या उभ्या राहत आहेत. यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली. आता त्यापुढील पाऊल म्हणून बुधवारी शहरात मुंबई नाका, गंगापूर नाका यांसह अनेक ठिकाणी विशेष मोहीम राबवत वाहन तपासणी करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरूध्द, सिग्नल नसतानाही मार्गक्रमण करणाऱ्यांविरुध्द, चुकीच्या दिशेने येणाऱ्यांविरुध्द, सुसाट वाहन चालविणाऱ्यांविरुध्द, विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्यांविरुध्द तसेच वाहनासंदर्भातील कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना पोलिसांना पाहून काहींनी रस्त्यातच मागे फिरण्याचा मार्ग स्वीकारल्याने काही ठिकाणी किरकोळ अपघात झाले. वादही झाले.

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Image of a person crossing the road while looking at their mobile phone or a related graphic
Viral Video : मोबाइल पाहत रस्ता ओलांडणं पडलं महागात, दुचाकीवरून आलेल्या पोलिसाने लगावली कानशिलात अन् तरुण…
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी
new york city charges congestion fee peak-hour traffic
न्यूयॉर्कमध्ये वाहनचालकांना द्यावे लागणार ‘वाहतूक कोंडी शुल्क’! काय आहे ‘कंजेशन प्रायसिंग’? मुंबईतही अमलात येऊ शकते?
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
traffic jam Katai Karjat State Highway Khoni Nevali village
Video : काटई कर्जत राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी; नोकरदार, दूर पल्ल्याचे प्रवासी अडकले

हेही वाचा…मालेगावात परप्रांतियास लुटणाऱ्याला अटक

शहर परिसरात वाढती गुन्हेगारी पाहता पोलीसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी मोहिम राबवली. आता पुढील पाऊल म्हणून बुधवारी शहर परिसरातील मुंबई नाका, गंगापुर नाका यासह काही ठिकाणी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मध्ये वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरूध्द सिग्नल जंपिंग, चुकीच्या बाजुने येणारे, बेदरकारपणे वेगात वाहन चालवणे, तसेच इतर वेगवेगळ्या शिर्षकाखाली कारवाई करण्यात आली. दोघींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरू असतांना पोलीसांना घाबरत काहींनी रस्त्यात यु टर्न घेतल्याने काही ठिकाणी किरकोळ अपघात झाले. काही ठिकाणी वादही झाले.

दरम्यान, वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाहतूक नियमांचे पालन करणारे, चालक आणि पाठीमागे बसणाऱ्या दोघांकडे हेल्मेट असणाऱ्यांना प्रशस्तीपत्र देत गौरविण्यात आले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मदतीने वाहतूक नियमांविषयी प्रबोधन करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांनी फलक हाती घेत नियमांकडे लक्ष वेधले.

हेही वाचा…साल्हेरजवळील सालोटा किल्ल्यावर चढाईसाठी नवीन वाट

किती जणांवर कारवाई ?

नाशिक वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जुना गंगापुर नाका, मुंबई नाका यासह अन्य ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत हेल्मेट नसणारे ९७, आसनपट्टा न लावलेले ३३, दुचाकीवर तिघे बसलेले २३, मनाई असलेल्या ठिकाणी वाहने उभे करणारे १८, अवैध काचा असलेले पाच, बंदी असतानाही मार्गावर प्रवेश करणारे ५७, सिग्नल न जुमानणारे ८७, भ्रमणध्वनीवर बोलत वाहन चालविणारा एक, झेब्रा क्रॉसिंगपुढे वाहन उभे एक आणि इतर १३८ अशा ४६० वाहन चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली.

रिक्षाचालकांवर कृपादृष्टी

वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बुधवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय चारचाकी वाहनचालकांवरही नियमांचे पालन न केल्याने कारवाई झाली. परंतु, या कारवाईतून मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या रिक्षा सुटल्या. त्यांच्यावर कारवाई झाली नाही.

Story img Loader