नाशिक रोड परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक : शहरातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुन्हेगारांकडून पोलिसांना आव्हान देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. नाशिक रोड परिसरात समाजकं टकांची हिंमत अधिकच वाढली आहे.
रविवारी रात्री परिसरात दहशत माजविण्यासाठी दोन अल्पवयीन बालकांनी मातोश्रीनगर परिसरात इमारतीखाली उभ्या के लेल्या दुचाकी तसेच चारचाकी अशा ११ वाहनांची तोडफोड के ली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नाशिक रोड परिसरात सोनसाखळी चोरी, वाहनांची जाळपोळ, तोडफोड नित्याची झाली आहे. याच घटनेची पुनरावृत्ती रविवारी मध्यरात्री झाली. डीजीपीनगर परिसरात राहणारे हॉटेलचालक जफर तौसिद खान (२९, गुलमोहर पार्क, डीजीपीनगर) हे रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आजारी सासरे लतिफ पठाण (रा. बरकत व्हिला, फ्रेन्डस कॉलनी, इच्छामणी लॉन्समागे, उपनगर) यांना भेटून घरी परत जात होते. त्या वेळी सासऱ्यांच्या घरासमोर दोन जण आरडाओरड करत दुचाकीवरून भरधाव जाताना दिसले. त्यांनी खान यांची गाडी थांबवली. दुचाकीचालकाने हातात दंडुका घेऊन त्यांच्या गाडीची काच फोडली. पठाण यांच्या कारची काच फोडली. दहशत माजवत ते पुढे निघून गेले. परिसरातील मातोश्रीनगरसह अन्य भागांतील ११ वाहनांच्या काचा त्यांनी फोडल्या.
रात्री उशिरा हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर परिसरातील नागरिक घराबाहेर आले. तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उपनगर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून ते अल्पवयीन आहेत. मद्याच्या नशेत त्यांनी हे कृत्य के ले असून मागील मारहाणीचा वचपा काढण्यासाठी त्यांनी हा प्रकार के ल्याची कबुली दिली.
पोलीस या प्रकरणात अजून कोणाचा हात आहे का, याचा तपास करत आहेत. नाशिक रोडसह संपूर्ण शहरात वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्तांनी कठोर उपाय करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरात वाहन अडवून लूटमार, रात्री परतणाऱ्या कामगारांना शस्त्राचा धाक दाखवून लूटमार, चोरी, सोनसाखळी हिसकावून पलायन असे प्रकार वाढले आहेत. त्यातच पूर्ववैमनस्यातून गुंडांमध्ये होणारी हाणामारी इतरांसाठी त्रासदायक ठरत आहे.