नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत मोठ्या प्रमाणात समाजात चुकीचे संदेश व अफवा पसरविण्यात येत आहेत. अशा संदेशांची सत्यता पडताळण्यासाठी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध माहितीची विद्यार्थी व पालकांनी खात्री करुन घ्यावी असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, परीक्षेबाबत विविध समाज माध्यामांद्वारे लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत अफवा व चुकीचे संदेश पसरविण्यात येत आहे. परिक्षार्थीनी कुठल्याही समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या संदेशांवर, अफवांवर विश्वास ठेवू नये. तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. अशाप्रकारे चुकीचे संदेश, अफवा पसरविणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – नाशिक : रखडलेल्या कलाग्रामच्या कामासाठी पुन्हा हालचाली

हेही वाचा – आश्रम शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणासाठी सामंजस्य करार – सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना लाभ

हिवाळी सत्र-२०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा राज्यातील एकूण शंभरपेक्षा अधिक परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. विविध विद्याशाखांच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेकरीता सुमारे ३०,९०२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून काळजी घेण्यात येत आहे. तरी संलग्नित महाविद्यालय प्रमुख, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी याबाबत सजग रहावे असे विद्यापीठाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik rumors should not be believed appeal of health university ssb