नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसायंविरोधात जिल्ह्यात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन दिवसात ३३ संशयितांविरुध्द ३६ गुन्हे दाखल कण्यात आले असून एक लाख सात हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कारवाई सुरू आहे. २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी नाशिक ग्रामीण तसेच मालेगाव विभागातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध देशी दारू विक्री करणारे व गावठी हातभट्टीची दारू बनविणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

हेही वाचा…बसमध्ये चढणाऱ्यांचे दागिने चोरणाऱ्यास अटक

याअंतर्गत ३३ संशयितांविरूध्द ३६ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत २६००० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि ४९९ लिटर गावठी दारू व इतर साहित्य सामग्री असा एक लाख सात हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.