नाशिक : देवळा तालुक्यात घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरुन देणाऱ्या अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून १३६ सिलेंडर, दोन चारचाकी वाहने आणि गॅस भरण्याची साधनसामग्री असा ११ लाख १५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…नाशिकमध्ये नोव्हेंबरमधील आठ वर्षातील सर्वात थंड दिवस, तापमान ८.९ अंशावर

देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाषनगर परिसरात काही संशयित हे घरगुती गॅस व्यावसायिक कारणांसाठी असलेल्या निळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या भरुन देत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली. पथकाने छापा टाकला. भागवत जाधव (४२, रा. सुभाषनगर) या संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला. छाप्यात घरगुती वापराचे १०१ सिलेंडर, निळ्या रंगाचे ३५ सिलेंडर असे एकूण १३६ गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक वजनकाटा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पंप, इलेक्ट्रॉनिक मोटार तसेच दोन चारचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik rural police seized 136 cylinders vehicles and equipment worth rupess 11 15 lakh in devala sud 02