नाशिक: नाशिक ग्रामीण पोलिसांचे अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू असून आठ दिवसांत ११९ आरोपींविरूध्द ७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १८ लाख १७ हजार ४१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अवैध व्यवसाय विरोधी अभियान अंतर्गत आठ विशेष पथक तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी आठ दिवसात ७० ठिकाणी छापे टाकले असून ११९ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी अवैध व्यवसायांविरूध्द माहिती देण्यासाटी ६२६२२५६३६३ या मदतवाहिनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.