मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेतर्फे सुरु असलेल्या विशेष महास्वच्छता अभियानात पालकमंत्री दादा भुसे यांनी सहभाग नोंदवला. हातात फावडा घेत येथील मोसम नदीपात्रात उतरुन भुसे यांनी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर स्वच्छतेच्या कामास हातभार लावला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या नागरी क्षेत्रांमध्ये विशेष महास्वच्छता अभियान हाती घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानुसार सहा जानेवारीपासून महापालिकेतर्फे महास्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात शहरातील सर्व सार्वजनिक व खासगी मालकीच्या खुल्या जागा, नदी,नाले आदी ठिकाणांची स्वच्छता केली जात आहे.
शुक्रवारी श्रीरामनगर अमरधामपासून अलम्मा एकबाल पुलापर्यंत नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. यावेळी पालकमंत्री भुसे हेदेखील या अभियानात सहभागी झाले. अधिकारी,कर्मचारी व सफाई कामगार अशा महापालिकेच्या जवळपास ४०० जणांनी श्रमदान करत ही स्वच्छता केली. त्यासाठी १० जेसीबी, १० ट्रॅक्टर, चार घंटागाड्या, तीन डंपर, एक पोकलॅण्ड असा लवाजमा लावण्यात आला होता. यात नदीपात्रातील काटेरी झाडे, झुडपे, कचरा साफ करण्यात आला. जवळपास ८५ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. शिवाय नदीपात्राचे सपाटीकरणदेखील करण्यात आले.या अभियानात आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र फातले, उपायुक्त सुहास जगताप, माजी उपमहापौर नीलेश आहेर, शहर अभियंता कैलास बच्छाव, सहायक आयुक्त सचिन महाले, हरिश डिंबर, आदी सामील झाले होते.
हेही वाचा…आगामी लोकसभा निवडणुकीत मद्य, रोकड जप्ती कारवाईची माहिती लगेच निवडणूक आयोगाला मिळणार, कशी? वाचा…
नदीपात्राची स्वच्छता ठेवावी
सांडपाणी आणि कचरा यामुळे मोसम नदीपात्रात घाणीचे साम्राज्य निर्माण होते. तसेच या नदीला गटार गंगेचे स्वरुप आल्याचे चित्र दिसते. ही परिस्थिती बदलून मोसम नदीचे पात्र कायमस्वरुपी स्वच्छ कसे राहील, यासाठी शहरवासियांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन भुसे यांनी याप्रसंगी केले. तर मोसम नदीपात्रात कचरा टाकू नये तसेच कचरा टाकणाऱ्यास देखील प्रतिबंध करुन सर्वांनी मोसम नदीचे पावित्र्य राखावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी केले.
हेही वाचा…भारत सरकार हवे की मोदी सरकार? भाजप मंत्र्याच्या मतदारसंघातील ग्रामस्थांचा संताप
८५ मेट्रीक टन कचऱ्याची उचल
श्रीरामनगर अमरधामपासून अलम्मा एकबाल पुलापर्यंत नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. यावेळी पालकमंत्री भुसे हेदेखील या अभियानात सहभागी झाले. अधिकारी,कर्मचारी व सफाई कामगार अशा महापालिकेच्या जवळपास ४०० जणांनी श्रमदान करत ही स्वच्छता केली. त्यासाठी १० जेसीबी, १० ट्रॅक्टर, चार घंटागाड्या, तीन डंपर, एक पोकलॅण्ड असा लवाजमा लावण्यात आला होता. यात नदीपात्रातील काटेरी झाडे, झुडपे, कचरा साफ करण्यात आला. जवळपास ८५ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला.