नाशिक – बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आवश्यक असणारे मतदान साहित्य यंत्रणेकडून देण्यात येणार असल्याने साहित्य, निवडणूक अधिकारी आणि अन्य काही वस्तुंची ने-आण करण्यासाठी होणाऱ्या वाहतुकीमुळे कोंडी हाऊ नये, यासाठी नाशिक वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी मतदान साहित्य देण्यासाठी मंगळवारी तसेच बुधवारी मतदान झाल्यानंतर ते पुन्हा जमा करण्यासाठी नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य, इगतपुरी या मतदारसंघांसाठी शहरातील काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. सामान तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचारी यांची ये-जा करण्यासाठी होणारी वाहतूक पाहता कोंडी होऊ नये, यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय केंद्राकडे येणाऱ्या रस्त्यावरील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.
हेही वाचा – नाशिक : प्रचार फेऱ्यांमुळे वाहतूक कोंडी
नाशिक पूर्व मतदारसंघासाठी मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलातून मतदान साहित्याचे वाटप मंगळवारी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत करण्यात येईल. तसेच बुधवारी हे साहित्य जमा होईल. या काळात होणारी वाहतूक काेंडी पाहता स्वामी नारायण चौक, मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल ते क. का. वाघ महाविद्यालयपर्यंत धुळे बाजूकडील मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या सेवा मार्गावरील वाहतूक सर्व प्रकराच्या वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. नाशिक पश्चिमसाठी संभाजी स्टेडियम परिसरातील वाहतूक मार्गात बदल असून यामध्ये महाले पेट्रोल पंप ते सिंहस्थ नगर या मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांना प्रवेश बंद. स्टेट बँक चौक ते रतनसिंह बाबुसिंग परदेशी चौक या मार्गावरही दोन्ही बाजूने वाहनांना प्रवेश बंदी राहिल.
हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात, चार जण जखमी
इगतपुरी मतारसंघासाठी सीबीएस परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. सीबीएस सिग्नल ते मेहेर सिग्नलकडे जाणारा आणि मेहेर सिग्नल ते सीबीएसकडे येणारा अशा दोन्ही बाजूकडील रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. नाशिक मध्यसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह परिसरातील वाहतूक मार्गात बदल असून गायकवाड सभागृह ते हिरवे नगरपर्यंत नंदिनी नदी बाजुलगतच्या मार्गापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. वाहनचालकांनी अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले.