नाशिक : शासनाने अंगणवाडी केंद्रांना वीजजोडणी देण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या इमारतीतील अंगणवाडी केंद्रांना विद्युत जोडणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत एका महिन्यात विद्युत जोडणी नसलेल्या ३०३० पैकी आतापर्यत २२८८ अंगणवाड्यांना वीज जोडणी करण्यात आली असली तरी अद्याप ७४२ अंगणवाड्यांना जोडणीची प्रतिक्षा आहे.

केंद्र पुरस्कृत सक्षम अंगणवाडीत अद्ययावतीकरण योजनेंतर्गत स्वमालकीच्या अंगणवाड्यांना सुविधा देण्यासाठी विद्युत जोडणी करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागातंर्गत पाच हजार ११५ अंगणवाड्यांचे काम पाहिले जाते. त्यातील चार हजार २५६ स्वमालकीच्या इमारतीत सुरू असून, त्यापैकी ४०३ अंगणवाड्यांना वीज सुविधा आहे. इतर ६६८ अंगणवाड्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज प्राप्त झाली आहे. स्वमालकीच्या ४२९० पैकी ३०३० अंगणवाड्यांना विद्युत जोडणी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तत्काळ विद्युत जोडणीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, उपअभियंता (महापारेषण) यांच्या संयुक्त प्रयत्नाने २२८८ अंगणवाड्यांना वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. उर्वरीत अंगणवाडींची विद्युत जोडणी २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी यंत्रणेला दिले आहेत. वीज जोडणीचे काम सुरू असून दररोज बालविकास प्रकल्पाधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात येत असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी दिली.

Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
rockfall protection at Saptshringi Ghat Nanduri Ghat road
नांदुरी-सप्तश्रृंगी गड रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
murder of youth in Bhusawal, murder Bhusawal,
भुसावळमध्ये तरुणाच्या हत्येनंतर पाच संशयितांना अटक
nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
nashik hotel gun on servant
नाशिक : हॉटेलमधील नोकरावर बंदूक रोखणाऱ्या पोलिसाचे निलंबन ?
nashik land purchase fraud
नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा…हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात

२६ जानेवारीपर्यंत काम पूर्ण

महिनाभरातच स्वमालकीच्या २२८८अंगणवाडी केंद्रांना वीज जोडणी करण्यात आली आहे. सर्व अंगणवाड्यांमध्ये विद्युत पुरवठा असल्यास तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना डिजीटल माध्यमातून पूर्व शालेय शिक्षण देवून त्यांचा सर्वांगीण विकास करावयास मदत होणार आहे.. तसेच अंगणवाडी केंद्रांना वीज उपलब्ध करुन दिल्यानंतर केंद्रांत पोषण वाटीका, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आर. ओ. युनिट, एलईडी टीव्ही उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाच्या धोरणास मदत होणार आहे. २६ जानेवारीपर्यत उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला निर्देश दिले असून त्याचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)

Story img Loader