नाशिक : गावठी बंदूक, शस्त्र साहित्यासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांच्या टोळीतील दोघांना उपनगर पोलिसांनी गस्ती दरम्यान ताब्यात घेतले. शनिवारी मध्यरात्री सहायक निरीक्षक सुयोग वायकर यांच्यासह गस्ती पथक आणि सुंदरनगर चौकीतील पोलीस कर्मचारी जयभवानी रस्त्यावरील शकुंतला पेट्रोल पंपाशेजारील परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना काही जण संशयास्पद हालचाली करताना दिसले. पोलिसांनी त्याला हटकले.

हेही वाचा…कमी बससंख्येमुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंब

स्वप्नील उर्फ भूषण गोसावी, दानिश शेख, बबलू यादव, सागर म्हस्के, तुषार पाईकराव, सुरज भालेराव, अनिकेत देवरे आणि रोहित लोंढे यांच्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. स्वप्नील आणि बबलू यांच्याकडे गावठी बंदूक, दोन जिवंत काडतुसे, कोयता, नायलॉन दोरी, मिरची पूड सापडली. पोलिसांनी संशयितांवर विविध कलमान्वये उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader