नाशिक – निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे अपघातग्रस्त झालेल्या सुखोई एमकेआय – ३० विमानामुळे द्राक्षबाग व कोबी पिकांसह शेती उपयोगी वस्तूंचे लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक तलाठ्यांनी पंचनामा करीत यासंबंधीचा अहवाल निफाड तहसीलदारांकडे सादर केला आहे.

उड्डाण चाचणीसाठी आकाशात झेपावलेले सुखोई एमकेआय -३० हे लढाऊ विमान मंगळवारी दुपारी निफाड तालुक्यातील एका शेतात कोसळले होते. अकस्मात निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे ही दुर्घटना घडली. विमान नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर दोन्ही वैमानिक हवाई छत्रीच्या (पॅराशुट) सहाय्याने बाहेर पडल्याने बचावले.

Fish dead in Murbe Satpati Bay palghar news
मुरबे सातपाटी खाडीत हजारो मासे मृत; प्रदूषित पाण्यामुळे घटना घडल्याचे मच्छीमारांचे आरोप
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
suburban train derails
लोकल घसरल्याने १०० फेऱ्या रद्द l कल्याणजवळची घटना, लाखो प्रवाशांचे हाल
Bihar hooch Tragedy
Bihar Hooch Tragedy : दारूबंदी असलेल्या राज्यात विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव, घराघरांत मृतदेह, अनेकांनी दृष्टी गमावली; बिहारमध्ये नेमकं काय घडलं?
residents in koregaon park face water shortage
कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण, का आली ही वेळ !
Gang rape in Bopdev Ghat triggers safety concerns
असुरक्षित टेकड्या; भयभीत पुणेकर
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
Loksatta bajar rang Indices Sensex and Nifty fell Market stock market Government
शेअर बाजार: पडझड आहे, भूकंप नाही…

हेही वाचा – कांद्याने या मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांना रडविले…

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नाशिकवर ठाकरे गटाचे वर्चस्व

अनियंत्रित सुखोई शिरसगाव येथील शेतात कोसळले. विमानाला आग लागली. त्याचा चक्काचूर झाला. सुखोई पडल्याने सुकदेव मोरे व ज्ञानेश्वर मोरे यांच्या शेतातील पिकांचे व शेतीपयोगी साहित्याचे नुकसान झाले. विमानाच्या आगीमुळे द्राक्षबागेचे नुकसान झाले. झाडे जळून गेली. बागेचे अँगल व तारांचेही नुकसान झाले. याचा पंचनामा स्थानिक तलाठ्यांनी केला. त्यानुसार गट क्रमांक १३३, १३२ मध्ये लोखंडी अँगल व तारा (चार लाख रुपये एकरी), ठिबकचे साहित्य (दीड लाख), द्राक्षबाग (सहा वर्षांपुढील असल्यास ५० लाख रुपये) आणि गट क्रमांक २६ मध्ये कोबी एक लाख, विंधनविहीर दीड लाख, विहिर व इलेक्ट्रिक साहित्य अडीच लाख, मल्चिंग पेपर व ठिबकचे साहित्य ३० हजार, लोखंडी ॲगल व तारा ५० हजार रुपये अंदाजे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे.