नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी १० जूनला मतदान होणार आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यात २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने बहुसंख्य शिक्षकवर्ग निवडणूक कामात व्यस्त असल्याने शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांना २२ मेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करणे आणि अत्यंत कमी अवधीत प्रचार करणे, अशक्य होणार आहे.

शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, असे अपेक्षित असताना ऐन उन्हाळी सुट्टीत निवडणूक प्रक्रिया सुरु होणार असल्याने इच्छुकांचे प्रचार नियोजन गडबडले आहे. उन्हाळी सुट्टी असल्याने शाळा बंद आहेत. पाच जिल्ह्यातील ५४ तालुक्यातील सुमारे पाच हजार शाळेतील ६५ हजार मतदारांची घरोघरी भेट घेणे अशक्यप्राय आहे. निवडणूक प्रचार, गाठीभेटी यांना निवडणूक आयोगाने संधीच दिली नसल्याने इच्छुक उमेदवारांनी चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक राज्यातील शाळा सुरू झाल्यावर घेण्याची मागणी होत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…अक्षय्य तृतीयेला नाशिककरांसाठी आंबा महागच

आयोगाच्या कार्यक्रमानुसार १० जूनलाच निवडणूक घेण्याचे कायम राहिल्यास मतदानाची टक्केवारी कमी होण्याची धास्ती इच्छुक उमेदवारांना आहे. अनेक कर्मचारी सुट्टीत गावी गेलेले असतात. त्यामुळे मतदानास येण्यास टाळाटाळ होण्याची शक्यता असते. निवडणूक आयोगास या मतदारसंघात १०० टक्के मतदान होणे अपेक्षित असेल तर निवडणूक जूनअखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घ्यावी, उमेदवारांना सर्व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी, प्रचार प्रसार करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

बहुसंख्य शिक्षकवर्ग लोकसभा निवडणूक कामात व्यस्त असल्याने शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांना २२ मेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करणे आणि अत्यंत कमी अवधीत प्रचार करणे अशक्य होणार आहे.

हेही वाचा…शिंदे गटाच्या मेळाव्यात ’सलीम कुत्ता‘ नावाने घोषणाबाजी, दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्हा ठाकरे गटाचे प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

निवडणूक कार्यक्रम

निवडणूक अधिसूचना १५ मे रोजी प्रसिद्ध होणार. १५ ते २२ मे या कालावधीत अर्ज भरता येणार. २४ मे रोजी अर्ज छाननी. २७ मेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत. १० जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान. १३ जून रोजी मतमोजणी.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ
एकूण मतदार:- ६४७८६

महिला मतदार :-२०५८२

पुरुष मतदार :-४४२०४
जिल्हानिहाय मतदार

हेही वाचा…गंगापूर धरणातील गाळ उपशाचे काम थांबविण्याचा निर्णय

नाशिक २३६६८

नंदुरबार ४६०७

अहमदनगर १४९८५

धुळे ८२९७
जळगाव १३२२९

२०१८ मध्ये एकूण मतदार :- ५३८९२

Story img Loader