नाशिक : राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काही सधन उमेदवारांमुळे शिक्षक मतदारांवर लक्ष्मी प्रसन्न झाल्याचे दिसत आहे. एकेका मताचे बोल कुणी पाच हजार तर, कुणी तीन हजार रुपये लावल्याचे, जोडीला सोन्याची नथ, महागडे कपडे घरपोच आल्याची चर्चा रंगली असताना मतदानाच्या पूर्वसंध्येला खुलेआम पैसे वाटप होत असल्याचे प्रकार घडले. सव्वा दोन लाखाची रोकड जप्त करुन यंत्रणेने दोघांना ताब्यात घेतले. येवल्यात एकाकडून २० हजाराची रोकड जप्त करण्यात आली. नंदुरबारमध्ये आठ जणांना ताब्यात घेण्यात आले.

शिक्षक मतदार संघासाठी बुधवारी नाशिक विभागातील ९० केंद्रांवर मतदान होत आहे. ६९ हजार ३६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणात २१ उमेदवार असून शिवसेनेचे (शिंदे गट) किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, भाजपशी संबंधित अपक्ष विवेक कोल्हे या चौघांमध्ये मुख्य लढत होत आहे. शिक्षणसम्राट, साखर सम्राटांसारखे दिग्गज रिंगणात असल्याने निवडणुकीला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. पाचही जिल्ह्यात मद्य व मटण पार्ट्यांना रंग आला होता. अनेक ठिकाणी शिक्षक मतदारांना महागडे कपडे, पैठणीसह पैश्यांचे वाटप झाल्याचे सांगितले जाते. गेल्या शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावमध्ये सभा झाली होती. सभा संपल्यानंतर त्याच ठिकाणी खान्देशातील मतदारांना पैसे वाटप झाल्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाने केली होती. यासंबधीची कथित ध्वनिचित्रफितही या गटाच्या नेत्यांनी ट्विटरवर प्रसारित केली. या चित्रफितीची प्रांताधिकाऱ्यांमार्फत सध्या चौकशी सुरू आहे. उमेदवारांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणात प्रलोभने दाखविली गेल्याची तक्रार शिक्षणतज्ज्ञांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला या प्रकारात लक्षणीय वाढ झाल्याचे कारवाईवरून उघड झाले.

Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Scheduled Caste students scholarships,
अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती धोक्यात: महाविद्यालयांची टाळाटाळ अन्…
second phase, teacher recruitment,
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी? ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
UGC, recruit professors, Instructions UGC,
आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस नकार; प्रचलित नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्याच्या ‘यूजीसी’च्या सूचना
Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
Higher Education Policy State University Chancellor Elections
उच्च शैक्षणिक धोरणदशा!

हेही वाचा : नाशिक: आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरुंचा विद्यार्थ्यांना दिलासा

एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांमार्फत मनमाड शहरात पैसे वाटप होत असल्याचे उघड झाले. पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने गणेशनगर भागात कारवाई केली. एका घरात कोपरगाव येथील रेवणनाथ राजपूत आणि जयेश थोरात हे दोघे आढळले. त्यांच्याकडे ४५ पाकिटे होती. त्यात प्रत्येकी पाच हजार रुपये रक्कम होती. ही पाकिटे आणि प्रचार साहित्य अशी सुमारे सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. दोघा संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मनमाड विभाग मंडळ अधिकाऱ्यांनी दिली. येवल्यात तसाच प्रकार घडला. एका उमेदवाराच्या समर्थकाकडून शहरात पैसे वाटप केले जात होते. पथकाला त्याच्याकडे २० हजाराची रोकड सापडली असून संबंधिताविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे तहसीलदार आबा महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा : फाशीच्या डोंगराजवळ लुटमार करणारे सहा जण ताब्यात

नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयाजवळ पैसे वाटप करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांसह आचारसंहिता पथकाने छापा टाकला असता पाच हजार रुपये टाकलेली ४४ पाकिटे आढळून आली. पोलिसांनी संबंधीत ठिकाणाहून दोन लाख २० हजार रुपयांसह आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यातील अनेक जण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे रहिवाशी असल्याचे सांगितले जाते. पैसे वाटपप्रकरणी नंदुरबारमधील उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान, उमेदवारांकडून पैसे वाटप झाल्याच्या तीन तक्रारी आचारसंहिता कक्षाकडे प्राप्त झाल्या. यातील एक जळगावमधील असून उर्वरित दोन नाशिक जिल्ह्यातील असल्याचे या कक्षाच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

Story img Loader