नाशिक : सिडको प्रभाग क्रमांक २५ मधील साळुंके नगरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मनपा सिडको पाणीपुरवठा विभाग कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साळुंकेनगर परिसरात काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे . पाणी कमी दाबाने येते तर कधी येत नाही. महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांनी सावतानगर येथे माजी नगरसेवक तथा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.

हेही वाचा…आश्रमशाळांमधील १२ हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचे धडे

बडगुजर यांच्या नेतृत्वात महानगर पालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील पाणी पुरवठा अधिकारी गोकुळ पगारे यांची भेट घेण्यात आली. पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी साळुंके नगर परिसरातील प्रकाश गडाख, रमेश होळकर, विलास शिंदे, नितीन खैरनार आदी उपस्थित होते. पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता पगारे यांनी या भागात भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik thackeray group protests over water supply issues in salunkhe nagar agitation called off after assurances psg