नाशिक : बालपणापासून सोबत असलेल्या नाशिकरोड येथील दोन मित्रांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. नाशिकरोड येथील गिते मळा परिसरात राहणारा सचिन करवर आणि म्हसोबा मंदिरामागील संकेत राठोड हे दोघे बालपणापासूनचे मित्र होते. नुकतीच त्यांनी १२ वी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. दोघांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.

सचिनचे वडील मालधक्क्यावर तर, संकेतचे वडील मिस्त्री काम करुन घरचा उदरनिर्वाह करत आहेत. दोन्ही मित्रांनी शनिवारी रात्री रेल्वेच्या वालदेवी नदीपुलावरील एका खांबाजवळ उभे राहून मुंबईवरून नाशिकरोडकडे जाणाऱ्या रेल्वेखाली आत्महत्या केली.

हेही वाचा…नाशिक : सिन्नरमधील तीन सावकारांविरुध्द वर्षानंतर गुन्हा

आत्महत्या करण्यापूर्वी या दोघांनी आपल्या भ्रमणध्वनीवर भावपूर्ण श्रध्दांजली असा संदेश टाकला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. रविवारी दुपारी दोघांवर देवळाली येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

Story img Loader