नाशिक : पंचवटीतील हनुमानवाडी परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे यांच्या वाहनाच्या काचेवर भलामोठा दगड फेकून तोडफोड करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी कोकणे यांच्यावर हल्ला झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालाशी या हल्ल्याचा संबंध कोकणे यांच्यासह ठाकरे गटाकडून जोडला जात आहे.

पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यालय परिसरातील मैत्रपुष्प इमारतीच्या वाहनतळात ही घटना घडली. या इमारतीत कोकणे वास्तव्यास आहेत. वाहनतळात त्यांची चारचाकी मोटार उभी होती. रात्री कुणीतरी भलामोठा दगड फेकून तिची काच फोडून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघड झाला. कोकणे हे दूध आणण्यासाठी घराबाहेर पडले असता वाहनाची काच फोडण्यात आल्याचे दिसले. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Phulewada Replica in Pune
पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Akshays parents went to Ambernath Municipality for burial permission their application was not accepted
अंबरनाथमध्येही अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध पालकांची पालिका, स्मशानभूमी आणि पोलिसात धाव
dispute in Bhandara Adv Gunaratna Sadavarte ST Bank meeting Throwing chairs on police
भंडारा : ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी बँकेच्या सभेत तुफान राडा! पोलिसांवर फेकल्या खुर्च्या, धक्काबुक्की…
Ajit Pawar former corporator Vinod Jaywant Nadhe shot from a pistol
अजित पवारांच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तूलातून गंमतीत गोळीबार; माजी नगरसेवकासह दोघांना अटक
Nagpur hit and run case chandrashekhar Bawankules sons vehicle checked by RTO
नागपूर हिट ॲन्ड रन प्रकरण : बावनकुळे यांच्या पुत्राच्या वाहनाची आरटीओकडून तपासणी
Argument in Bar in 2016 BJP MLA Krishna Khopdes son had surrendered
बारमध्ये वाद : नागपूर भाजपच्या ‘या’ आमदाराच्या पुत्राने केले होते आत्मसमर्पण
Pune, liquor, Ganesh utsav, violation,
पुणे : गणेशोत्सवात मध्यभागात मद्यविक्री बंदीची कडक अंमलबजावणी, उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

हेही वाचा…Video : जळगाव जिल्ह्यातील इंग्रजी शाळेचा आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशास नकार, यावल एकात्मिक कार्यालयावर पालकांची धडक

वाहनाच्या तोडफोडीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन दिले. कोकणे यांच्या वाहनावरील हल्ला गंभीर बाब असून हल्लेखोरांना शोधून त्यांना कठोर शासन करावे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी दिला. शहरात गुन्हेगारी वाढत आहे. गुंडगिरी, खून, विनयभंग, सोनसाखळी खेचणे असे प्रकार घडत आहेत. गुंडांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून हल्लेखोरांवर कारवाईचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

हेही वाचा…नाशिक : पत्नी, सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या

विरोधकांवर संशय

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने यश मिळविल्यानंतर विरोधकांचे अवसान गळाले. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी ते कुठल्याही थराला जात असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. शहरात ठाकरे गटाचे वर्चस्व वाढत असून अनेकांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घाबरविण्यासाठी राजकीय आकसबुध्दीने हे कृत्य केले गेल्याचा संशय ठाकरे गटाने व्यक्त केला. दोन वर्षांपूर्वी कोकणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातून ते बचावले. त्यामुळे या सर्व घटना लक्षात घेऊन तपास केल्यास यामागे कोणाचा हात आहे, हे पोलिसांच्या निदर्शनास येईल. आमच्या पदाधिकाऱ्यांवर व मालमत्तांवर असेच हल्ले होत राहिल्यास आम्ही मूग गिळून गप्प बसणार नाही, असा इशारा देण्यात आला.