नाशिक : उन्हाच्या तीव्रतेसह पाणी टंचाईचे चटके सर्वत्र जाणवत असताना जिल्ह्यातील धरणसाठा वेगाने कमी होत असून एप्रिलच्या प्रारंभी लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये २० हजार ५६१ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ३१.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्के कमी जलसाठा आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ४७ टक्के जलसाठा आहे.

पावसाअभावी यंदा धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. समन्यायी तत्वावर पाणी वाटपाच्या सूत्राने जिल्ह्यातील काही धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी पाणी द्यावे लागले होते. एकूण गरज वाढत असताना जलसाठ्याचे घटते प्रमाण यंदाचा चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या वर्षीचा विचार करता यंदा धरणांमध्ये १० हजार दशलक्ष घनफूट इतका कमी जलसाठा आहे. गतवर्षी एप्रिसच्या प्रारंभी धरणांमध्ये ३० हजार ५४० दशलक्ष घनफूट (४६.५१ टक्के) जलसाठा होता. एक-दोन धरणांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच धरणांतील जलसाठा निम्याहून कमी झाला आहे. पालखेडमध्ये (६१ टक्के) व नांदूरमध्यमेश्वर बंधारा (९८) हे वगळता कुठल्याही धरणात ५० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा नाही. काश्यपीमध्ये ८४४ दशलक्ष घनफूट (४५), गौतमी गोदावरी ७०२ (३७), आळंदी ३०४ (३७), करंजवण (१३२५ (२४), ओझरखेड ४४९ (२१), दारणा १७६० (२४), मुकणे २२२१ (३०), वालदेवी ४८१ (४२), चणकापूर ७११ (२९), हरणबारी ४५५ (३९), गिरणा ५७९० (३१), पुनद ९९९ दशलक्ष घनफूट (७६ टक्के) असा जलसाठा आहे.

retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Drought of Funds , Micro Irrigation Scheme,
सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ, राज्यातील पावणेदोन लाखहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित
Bombil , Saranga, low visibility , fish price ,
कमी दृश्यमानतेमुळे मासळीही दिसेनाशी; यंदाच्या वर्षी सरंगा, बोंबिलाच्या दरात ७० टक्क्यांनी वाढ
Work on direct water pipeline from Gangapur Dam begins
गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ, नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार
2024 hottest year recorded in the world
विश्लेषण : २०२४ आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष कसे ठरले? २०२५मध्येही हीच स्थिती?
north-south winds Temperature increase December winter
गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये तापमानवाढ; उत्तर-दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम

हेही वाचा : नाशिक: प्रचाराच्या धामधुमीत टंचाईचा प्रश्न ऐरणीवर, ६३९ गावे-वाड्यांना टँकरने पाणी

आठ धरणांमध्ये पाणी कमी

नागासाक्या धरण आधीपासून कोरडेठाक आहे. या पाठोपाठ पुणेगाव (०.८०), तिसगाव (पाच टक्के) धरणांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. वाघाड (१९ टक्के), ओझरखेड (२१), भावली (१३), कडवा (२१), केळझर (१७), माणिकपूज (११) असा जलसाठा आहे. आठ धरणांमध्ये तुलनेत कमी जलसाठा आहे.

Story img Loader