नाशिक : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर आणि नाशिक जिल्हा जलदगती मार्गाने जोडण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपूर-समृद्धी महामार्ग इगतपुरीतून जातो. ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलीकडील भागातून वाढवण बंदरास जोडणाऱ्या नव्या हरित मार्गावर विचार होत आहे. या माध्यमातून नाशिकसह उत्तर महारा्ष्ट्राच्या विकासाला वेग मिळणार असल्याचा विश्वास जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणने (जेएनपीए) व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही सूचना केली. ठाणे जिल्ह्यातील जे मार्ग प्रस्तावित वाढवण बंदराकडे जातात, ते पुरेसे नाहीत. त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यांचा विस्तार करावा लागणार आहे. राज्यातील व अन्य भागातून माल घेऊन येणाऱ्या वाहनांना ठाणे आणि मुंबईकडे जाण्याची गरज पडू नये, यासाठी ठाण्याच्या अलीकडून नवीन मार्गाची आवश्यकता जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणने (जेएनपीए) मांडली आहे. वाढवण बंदर प्रस्तावित करतानाही ते मुंबई, दिल्ली आणि नाशिकशी जोडलेले असावे, असे नमूद आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरदृष्टीने वाढवण बंदराला जोडणाऱ्या स्वतंत्र हरित मार्गाच्या विषयाला दिशा दिल्याचे जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला त्याचा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा-एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल

इगतपुरी केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे

वाढवण बंदराला जोडणारा हरित मार्ग असण्याची शक्यता वर्तवली जाते. इगतपुरीतील भरवीर फाटा येथे मुंबई-आग्रा महामार्ग आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहनांना एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर ये-जा करता येते. वाढवण बंदराशी जोडणारा नवीन मार्ग याच भागाशी संलग्न होण्याची शक्यता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील अधिकाऱ्यांना वाटते. भरवीर फाटा हे समृद्धी महामार्गासह नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील वाहनांना वाढवण बंदराकडे ये-जा करण्यासाठीचे केंद्र ठरू शकते, याकडे ते लक्ष वेधतात.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik will be connected to the proposed vadhvan port mrj