नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल यंदा ३० दिवसांच्या आत जाहीर झाले आहेत. अत्याधुनिक स्कॅनिंग पध्दतीचा अवलंब करीत परीक्षा विभागाने विविध विषयांच्या एकूण २५ लाख १२ हजार २८४ उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी पार पाडली.

मुक्त विद्यापीठाचे बहुसंख्य विद्यार्थी नोकरी व व्यवसाय करीत असल्याने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील उन्हाळी परीक्षाही २० दिवसांच्या अल्प काळात राज्यातील परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आल्या होत्या. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यपध्दतीचा अवलंब करून सर्व परीक्षांचे निकाल केवळ ३० दिवसांत जाहीर करण्यात आले. विद्यापीठाच्या ११० शिक्षणक्रमांसाठी २४२ सत्रनिहाय परीक्षांसाठी एकूण चार लाख ८९ हजार ६६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. महाराष्ट्रातील ६०१ केंद्रांना ऑनलाईन व गोपनीय पध्दतीने १३०७ प्रश्नपत्रिका वेळेत उपलब्ध करीत परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या होत्या. या परीक्षेसाठी विविध विषयांच्या २९ लाख नऊ हजार ८३१ उत्तरपत्रिकांपैकी उपस्थित विद्यार्थ्यांच्या २५ लाख १२ हजार २८४ उत्तरपत्रिका तपासून वेळेत निकाल जाहीर करण्याची मोठी जबाबदारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर होती.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
UPSC Preparation UPSC Mains Exam 2024 Overview of the question career
UPSC ची तयारी: UPSC मुख्य परीक्षा २०२४; प्रश्नाचे अवलोकन

हेही वाचा : नाशिक-मुंबई महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी उपाय, भिवंडीतील अवजड वाहनांसाठी वेळमर्यादेचे नियोजन

विद्यापीठाने अत्याधुनिक स्कॅनिंग पद्धतीचा अवलंब करून सर्व उत्तरपुस्तिकांचे कालमर्यादेत स्कॅनिंग केले. महाराष्ट्रभर निश्चित केलेल्या १०८ ऑनलाईन मूल्यमापन (कॅप) केंद्रावरील नियुक्त परीक्षकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण व चेहरा पडताळणी तंत्रज्ञानाच्या आधारे ओळखीची सत्यता पडताळली. उत्तरपुस्तिकांच्या मूल्यमापनाचे कामकाज विशिष्ट डिजिटल पध्दतीने पूर्ण करून निकाल जाहीर केले आहेत. परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्रभारी कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. हे निकाल मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील निकाल शीर्षकाखाली विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. निकालाच्या उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकन करण्यासाठी २२ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. या संदर्भात विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर उपलब्ध सूचनेनुसार कार्यवाही करावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा : प्रसिध्द भ्रमणध्वनी कंपनीच्या नावे बनावट साहित्याची विक्री – पोलिसांचा छापा

महत्वपूर्ण कामगिरी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे स्कॅनिंग पध्दतीचा अवलंब करून सर्व परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाकडून नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची कामगिरी महत्वपूर्ण ठरली. विद्यापीठाच्या ११० शिक्षणक्रमांसाठी २४२ सत्रनिहाय परीक्षांसाठी एकूण चार लाख ८९ हजार ६६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. २९ लाख नऊ हजार ८३१ उत्तरपत्रिकांपैकी उपस्थित विद्यार्थ्यांच्या २५ लाख १२ हजार २८४ उत्तरपत्रिका तपासून वेळेत निकाल जाहीर करण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पार पाडली.