नाशिक – पंचवटीत दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे बुधवारी पहाटे २५ वर्षाच्या युवकाची हत्या करण्यात आली. गगन प्रवीण कोकाटे (२५) असे मयत युवकाचे नाव असून हत्येसाठी महिलेने दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले. पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले. मयत युवक हा सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे.

पंचवटीत राहत असलेला गगन कोकाटे (२५) आणि भावना कदम (३९) यांची मैत्री होती. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पुढे गगन हा भावना हिला सातत्याने त्रास देऊ लागला. पंचवटी परिसरातील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे गगन याला बुधवारी पहाटे बोलविण्यात आले. त्या ठिकाणी संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला करुन गगनची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पंचवटी विभागाच्या सहायक आयुक्त पद्मजा बढे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड घटनास्थळी दाखल झाले. संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा विभाग एकच्या पथकानेही घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला. निरीक्षक कड यांना संशयित हे अशोकनगर परिसरातील असल्याचे समजले. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना

हेही वाचा – नाशिक : दुचाकीस्वारास लुटणाऱ्या दोन जणांना अटक

पथकांनी संकेत रणदिवे (२०), मेहफुज सय्यद (१८), रितेश सपकाळे (२०) तिघेही रा. अशोकनगर तसेच गौतम दुसाने (१८, रा. गंगापूर रोड) यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता गगन याच्या हत्येसाठी भावना कदम (रा. म्हसरूळ) हिने दोन लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी भावना हिलाही ताब्यात घेतले.

हेही वाचा – नाशिक : खड्ड्यांमुळे येवलेकर त्रस्त

संशयित महिला विवाहित

भावना कदम विवाहित असून एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्या माध्यमातूनच त्यांची संकेत, मेहफुज, रितेश आणि अन्य लोकांशी ओळख झाली. चारही मुले सामान्य कुटुंबातील असून सातपूर औद्योगिक वसाहतीत कामगार आहेत. केवळ पैशांच्या लोभापायी त्यांनी गुन्ह्यात सहभाग घेतला. हत्येचा कट रचल्यावर भावनाने गगन याला नेहमीच्या जागेवर भेटण्यासाठी बोलविले. त्या ठिकाणी संशयितांनी गगनची हत्या केली.

Story img Loader