नाशिक: शासकीय यंत्रणेकडून राबविण्यात आलेल्या उत्कृष्ठ उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर नामांकन देत सर्वोत्कृष्ठ उपक्रमांना स्कॉच ग्रुप या संस्थेच्या वतीने पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा हा पुरस्कार नाशिक जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा प्रभावी उपयोग करून पाणी टंचाई असणाऱ्या गावांमध्ये जमिनीतील पाणी पातळी वाढावी यासाठी मिशन भगिरथ प्रयास राबविण्यात आले. त्यानुसार बंधारे निर्मिती करण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी स्कॉच रेटिंग ग्रुप या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेला राष्ट्रीय स्कॉच पुरस्कार जाहीर झाला. दिल्ली येथे स्कॉच ग्रुपचे अध्यक्ष समीर कोचर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा