सामाजिक अवडंबर, विवाह पद्धत, समाजावर होणारा अन्याय यांसह इतर अनेक विषयांवर निर्णय घेण्यासाठी अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात १६ जानेवारी रोजी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. मारवाडी गुजराती समाजाचे हे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये होत असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे.
अधिवेशनात राजकीय, नोकरी, व्यापार-उद्योग या विषयांवरही सांगोपांग चर्चा होणार आहे. मारवाडी गुजराती समाजाचे राष्ट्रीय पातळीवर एकच व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न अधिवेशनामागे असल्याची माहिती मारवाडी गुजराती मंचचे अध्यक्ष डॉ. अजित बागमार व दिग्विजय कापडिया यांनी दिली. अधिवेशनात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
संपर्क – ९८२२५९२५४० ७७२०९४१२४५