नाशिक : स्वच्छ इंधन उपक्रमांतर्गत देशातील १७४ शहरांत शहरी गॅस पुरवठा योजनेस गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये नाशिकचाही समावेश असून गुरुवारी नाशिक येथे याचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. या योजनेत नाशिक, धुळे, बलसाड येथेही लवकरच अंतर्गत वाहिनीव्दारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यात येणार असून  सुरुवातीला टॅंकरद्वारा गॅस पुरवठा केला जाणार आहे. या संदर्भातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे संचालक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नैसर्गिक वायूच्या वापरातून इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच ग्रामीण भागास गॅस पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने नैसर्गिक गॅस वापराला प्राधान्य देण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राने नैसर्गिक वायू इंधन पुरविण्याच्या या उपक्रमात आघाडी घेतली असून मुंबई, पुणे नंतर नाशिक या विभागात ही सेवा देण्यात येणार आहे. यानंतर औरंगाबादमध्ये ही सेवा देण्याचा विचार आहे. सातारा, सांगली, नगर जिल्ह्य़ात ही सेवा टप्प्याटप्प्याने देण्यात येईल.

शहरात या अनुषंगाने १६०० कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात येत असून यासाठी ४०० किलोमीटर अंतरावर गॅस वाहून नेण्यासाठी वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. गॅस वाहिन्यांसाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याने सुरुवातीला टॅंकरने गॅस पुरवठा करण्यात येणार आहे.  नाशिक महापालिका आयुक्तांशी स्मार्ट सिटी अंतर्गत या सेवेचा विचार व्हावा या दृष्टीने चर्चा झाल्याचे पांडे यांनी सांगितले.  नाशिकमध्ये या सेवेला चांगला प्रतिसाद लाभेल. कंपनीचे ए. एम. तांबेकर यांनी सांगितले.

३५० रुपयात १४.८ किलो गॅस मिळणार

वितरकांकडून एल.पी.जी. किंवा अन्य गॅस सिलिंडर ८५० ते ९०० रुपयात देण्यात येते. यातून १४.८ किलो गॅस मिळतो. हाच गॅस नैसर्गिक गॅस योजनेच्या माध्यमातून ३५० ते ३७५ रुपयात मिळेल. यासाठी ग्राहकांना संबंधित कंपनीकडे नोंदणीसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम, ५०० रुपये अन्य खर्च अशी रक्कम जमा करायची आहे. या रकमेतून ही सेवा देतांना घरगुती गॅस वापर किंवा औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस मीटर बसविण्यात येणार आहे. विजेच्या दराप्रमाणे आपण वापरू तेवढय़ाच गॅसचे पैसे द्यावे लागतील.

पंतप्रधान दृक-श्राव्य माध्यमातून संवाद साधणार

गुरुवारी शहरी गॅस योजनेचा प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चित्रफितीच्या माध्यमातून नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. नाशिक येथील गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आदी उपस्थित राहणार आहेत.