आर्थिक चणचणीमुळे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेचा यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा नाटय़ प्रयोगाविना पार पडणार आहे. आर्थिक अडचणींमुळे यंदा नाटय़ प्रयोगाऐवजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात पुरस्कार सोहळा रंगणार आहे. अ.भा. मराठी नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेचे वि. वा. शिरवाडकर लेखन, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी आणि बाबूराव सावंत नाटय़कर्मी पुरस्कार अनुक्रमे प्रशांत दळवी, मोहन जोशी आणि हेमंत टकले यांना जाहीर झाले आहेत.  यंदा पुरस्कार सोहळा आर्थिक चणचणीमुळे कोणत्याही नाटय़ प्रयोगाविना होणार असून रंगभूमीप्रेमींसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली. परिषदेच्या वतीने दर दोन वर्षांनी पुरस्कार वितरण करण्यात येते. शुक्रवारी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यास ९८ व्या मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार अध्यक्ष, तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले उपस्थित राहणार आहेत. वि. वा. शिरवाडकर लेखन आणि प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्काराचे स्वरूप २५ हजाररुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र तसेच बाबुराव सावंत नाटय़कर्मी पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा. वसंत कानेटकर यांच्या नावे ज्या दिग्गजाला सन्मानित करण्यात येते, त्यांचे नावाजलेले नाटक नाशिककरांसाठी खास विनामूल्य सादर करण्यात येत असे. याआधी प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’ तसेच ‘सारखं छातीत दुखतं’ या नाटकांचे प्रयोग सादर झाले होते. यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सध्या रंगभूमीवर जोशी यांची प्रमुख भूमिका असलेले ‘नटसम्राट’ नाटक सुरू आहे. मात्र नाटकासाठीचा खर्च नाटय़ परिषदेला परवडण्यासारखा नसल्याने परिषदेचा पुरस्कार सोहळा यंदा प्रयोगाविना रंगणार आहे.

मराठी रंगभूमी दिन पुरस्काराचे अन्य मानकरी

दत्ता भट स्मृती पुरस्कार-विजय साळवे (अभिनय)

शांता जोग स्मृती पुरस्कार- नंदा रायते (दिग्दर्शन)

प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार-सुनील देशपांडे (प्रकाशयोजना)

गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार- मुरलीधर तांबट (नेपथ्य)

रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार-आनंद बापट (बालरंगभूमी)

वा. श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार- सुंगधा शुक्ल (सांस्कृतिक पत्रकारिता)

जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार-सुनील भास्कर (लोककलांवत)

रामदास बरकले स्मृती पुरस्कार- प्रकाश ननावरे (लेखन)

नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार-मनोहर शहाणे

विशेष योगदान पुरस्कार- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. राजेश आहेर, डॉ. अविनाश आंधळे, डॉ. राजीव पाठक पुरस्कारांचे स्वरूप दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे आहे.

सूर्यकांत देशपांडे, मंगेश लोखंडे, सुनील रत्नपारखी, हरून बागवान, पद्माकर बेळगावकर, विकास जाधव, रमेश रोकडे, रघुनाथ साळवे या दिवंगत रंगकर्मीच्या कुटुंबीयांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.