परीक्षा ताण आणि महापालिका, पोलिसांच्या निर्बंधामुळे उत्साह ओसरला

नवरात्रीला तीन दिवस होऊनही गरबा, दांडियापासून शहर परिसरातील युवावर्ग अद्याप काही अंशी दूर असल्याचे दिसून येत आहे. सध्या परीक्षेचा काळ असल्याने अभ्यासाच्या कारणामुळे विद्यार्थी फारसे बाहेर पडलेले नाहीत. त्याचे सावट या उत्सवावर पडलेले दिसून येत आहे. दुसरीकडे, महापालिकेने पोलिसांनी घातलेल्या अनेक निर्बंधामुळे नवरात्रीच्या उत्सवातील उत्साह ओसरल्याचे दिसत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

शारदीय नवरात्रोत्सवात रंग भरणारा ‘दांडिया-गरबा’ अद्याप युवावर्गासह दांडियाप्रेमींना आकर्षित करू शकलेला नाही. महापालिकेच्या काही र्निबधामुळे अनेक मंडळांनी सार्वजनिक उत्सवातून काढता पाय घेतला. डीजे किंवा मोठय़ा आवाजात संगीत वाजविण्यास मनाई असल्याने मंडळाच्या आवारात कार्यकर्त्यांऐवजी फारसे कोणी फिरकत नाही. काही मंडळांनी वाद्यवृंद बोलावत दांडियाप्रेमींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या नियमावलीमुळे वेळेचे बंधन आले आहे.

शहरातील महाविद्यालये, विद्यालयामध्ये दिवाळीपूर्व परीक्षांचे वातावरण आहे. काही विद्यालयांच्या परीक्षाही सुरू झाल्या आहेत. महाविद्यालयांमध्ये अहवाल सादर करणे, वह्य़ा पूर्ण करणे याध्ये युवावर्ग मग्न आहे. सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी विविध स्तरांतून येणाऱ्या व्यक्ती, कधी होणारे वाद यामुळे व्यावसायिक ठिकाणी जाऊन गरबा दांडिया नृत्य सादर करण्याकडे युवा वर्गाचा कल आहे. शहर परिसरातील लॉन्स किंवा मोकळ्या पटांगणावर व्यावसायिकांकडून दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी तारांकित व्यक्तींना बोलाविण्यात येत आहे. यासाठी आकर्षक भेटवस्तूही देण्यात येत आहे. यात काहींनी ध्वनिप्रदूषणमुक्त दांडियाला प्राधान्य देत ‘हेडफोन-भ्रमणध्वनी’च्या माध्यमातून दांडिया खेळण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

जाचक अटीत कालिका यात्रा

नाशिकच्या नवरात्रोत्सवाचा आरसा असलेली कालिका यात्राही यंदा प्रशासनाच्या जाचक अटीमध्ये अडकली आहे. अद्याप कालिका मंदिर देवस्थानाच्या आवारात विक्रेत्यांकडून दुकाने लावणे सुरू आहे. काहींनी प्रशासनाचा ससेमिरा चुकविण्यासाठी यात्रोत्सवातून बाहेर पडणे पसंत केले आहे. यामुळे नेहमीच गजबजलेल्या यात्रेचा उत्साह मावळल्याचे चित्र भाविकांचा हिरमोड करत आहे.

Story img Loader