आपल्या कार्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी राजकीय कार्यक्रम टाळून नाशिकमध्ये मद्यनिर्मिती उद्योगाच्या पाहणीत रमल्याचे दिसले. ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. संजय राऊत आदी नेत्यांचे दौरे नियोजित आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे देखील या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सकाळीच नाशिकमध्ये आले. कुणाला थांगपत्ता लागू न देता ते दिंडोरीतील मद्य उत्पादक कारखान्यांकडे रवाना झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> दुषित पाण्यामुळे पानवेलींचे साम्राज्य; नदीची पर्यावरणीय व्यवस्थाही धोक्यात- गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या बैठकीत यंत्रणांना कानपिचक्या

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील सत्ता संघर्षावर गुरूवारी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. याच दिवशी अजित पवार हे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात दाखल झाले. सकाळी साडेसात वाजता ओझर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. विमानतळातून बाहेर पडताना ताफ्यातील तीन वाहने आधी वेगळ्या दिशेने गेली.नंतर अजित पवार हे वेगळ्या वाहनातून दिंडोरीकडे मार्गस्थ झाल्याचे सांगितले जाते. प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठी दादांनी हा मार्ग अवलंबल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांच्या वाहनाच्या काचेला पडदा लावलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासमवेत कोण आहे, याची स्पष्टता झाली नाही.

हेही वाचा >>> नाशिक : उष्णतेच्या लाटेची चिन्हे; पारा प्रथमच ४०. २ अंशावर, तापमानात वाढ होण्याचा अंदाज

वलखेड फाट्यालगतच्या पेकॉर्ड इंडिया या मद्य निर्मिती कंपनीत जवळपास तासभर त्यांनी पाहणी केली. नंतर दादांच्या वाहनाचा ताफा साडेदहा वाजेच्या सुमारास याच भागातील युनायटेड स्पिरिट कंपनीत (सिग्राम) पोहोचला. या काळात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद टाळला. दादांचा हा खासगी दौरा आहे. लग्न सोहळ्यात उपस्थित राहिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. युनायटेड स्पिरीट हा कारखाना कधीकाळी बँक घोटाळा प्रकरणात परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याशी संबंधित होता. सत्ता संघर्षाकडे सर्वांचे लक्ष असताना अजित दादा मात्र मद्य उद्योगांच्या पाहणीत रमल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.