नाशिक: नाशिककरांनी शांतता राखावी, दंगलीच्या पार्श्वभूमीवर कुठलीही भडक प्रतिक्रिया उमटल्यास शहराची ओळख काय होईल, असा प्रश्न अन्न व ग्राहक सुरक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपले नाशिक शहर जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करत आहे. दंगलीचे शहर अशी ओळख झाल्यास शहराचा विकास थांबेल. शहरात पर्यटन, शिक्षण यांसह वेगवेगळ्या कारणांमुळे लोक येत राहतात. शहराचा वेगाने विकास होत असताना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जीव धोक्यात घातला. त्यांचे कौतुक आहे. काही सामान्य नागरिकही जखमी आहेत. शहराची शांतता महत्वाची आहे. याआधीही असे काही प्रसंग घडल्यावर दोन्ही गटांनी एकत्र येऊन चर्चा करत वादावर पडदा टाकला आहे. हा शहराचा इतिहास असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा : त्र्यंबकेश्वरसाठी तिसऱ्या सोमवारनिमित्त आजपासून जादा बससेवा

दुसरीकडे, लाडकी बहिण योजनेसाठी आतापर्यंत तीन कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले. त्यातील ७७ लाख महिलांपर्यंत पैसे पोहचले आहेत. काही महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. यासाठी महायुतीचे कार्यकर्ते तसेच बँकेचे अधिकारीही काम करत आहेत. तांत्रिक मुद्दे सोडवायला वेळ लागत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.