नाशिक : महायुती तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) अधिकृत उमेदवार छगन भुजबळ हे गुरुवारी सकाळी १० वाजता येवला येथे फेरीव्दारे शक्तीप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महायुतीच्या घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा येवला-लासलगांव मतदारसंघाचे प्रचार प्रमुख अंबादास बनकर यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नांदगाव येथे अलीकडेच झालेल्या अजय-अतूल संगीत रजनीप्रसंगी ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी पंकज आणि समीर भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे भुजबळ हे निवडणुकीत उमेदवारी करणार की नाही, अशी चर्चा रंगली होती. परंतु, सोमवारी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याहस्ते एबी अर्जाचे वाटप करण्यात आल्यावर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. २० वर्षांपासून भुजबळ हे येवला- लासलगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या काळात येवल्याला जलसंजीवनी देणारा मांजरपाडा-पुणेगाव दरसवाडी- डोंगरगांव कालवा, छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचा इतिहास सांगणारी शिवसृष्टी अशी कामे करण्यात आल्याचे बनकर यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येवला शहरातील संपर्क कार्यालयापासून सकाळी १० वाजता फेरीला सुरुवात होईल. ही फेरी विंचुर चौफुली-फत्तेपूर नाकामार्गे येवला तहसील कार्यालयाकडे जाईल. महायुतीतील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भुजबळ उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी एन्झोकेम हायस्कूल मैदान येथे सभा होणार आहे.