आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंना जोरदार धक्का बसला. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पराभव केला. शिवाय, सहकार क्षेत्रात पहिल्यांदाच उडी घेतलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन यांचा दणदणीत पराभव केला. निवडणुकीत भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे पालकमंत्री पाटील यांच्या गटाने १५, तर खडसे गटाला केवळ पाच जागांवर विजय मिळविता आला.

हेही वाचा >>>नाशिक: आमिष दाखवून दोन जणांना १० लाख रुपयांना गंडा; दोन संशयितांना पोलीस कोठडी

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल

रविवारी शहरातील सत्यवल्लभ सभागृहात मतमोजणी झाली. निवडणुकीत सर्व४४१ मतदारांनी हक्क बजावला. २०२२-२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी २० जागांसाठी ही निवडणूक चांगलीच गाजली. दूध संघात यापूर्वीच पाचोरा तालुका गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ हे बिनविरोध निवडून गेल्याने १९ जागांसाठी ३९ उमेदवार निवडणूक आखाड्यात होते. यात महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळसरळ लढत झाली. यातील सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांभाळली, तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शेतकरी विकास पॅनलमध्ये दोन्ही मंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचा समावेश, तर सहकार पॅनलमध्ये मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांच्यासह दिग्गज नेत्यांचा समावेश असल्याने निवडणूक चुरशीची झाली.

शेतकरी विकास पॅनलचे अरविंद देशमुख यांनी भटक्या-विमुक्त जमाती प्रवर्गातून, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शेतकरी विकास पॅनलकडून अनुसूचित जाती या प्रवर्गातून विजयी झाले. सावकारेंना २६४ मते मिळाली. आजपर्यंत सहकार क्षेत्रात प्रवेश न केलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव सोसायटी गटात महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालतीबाई महाजन यांचा २५९ इतकी मते मिळवून पराभव केला. महिला राखीवसाठी असणार्‍या दोन जागांमध्ये दोन्ही पॅनलना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. यात शेतकरी विकास पॅनलच्या पूनम पाटील आणि सहकार पॅनलच्या छाया गुलाबराव देवकर यांचा विजय झाला.

हेही वाचा >>>जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का, भाजपा उमेदवाराकडून मंदाकिनी खडसे यांचा पराभव

चाळीसगाव गटातून थेट मुक्ताईनगरमध्ये उडी मारत खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना आव्हान देत उमेदवारी करणारे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ही प्रतिष्ठेची लढाई जिंकली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. यात आमदार चव्हाण यांच्याकडे मुख्य प्रशासकपदाची जबाबदारी होती. या निर्णयाच्या विरोधात खडसे गट न्यायालयात गेले होते. तेथे या निर्णयाला स्थगिती मिळाली. मात्र, त्यांना प्रशासकपदासाठी ३२ दिवस मिळाले. या काळात आमदार चव्हाण यांनी दूध संघातील अपहाराचे प्रकरण शोधत गुन्हा दाखल केला. यानंतर दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. चव्हाण यांनी ७६ मतांनी विजय मिळविला.

धरणगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांचा दणदणीत विजय झाला. ओबीसी मतदारसंघातून पराग मोरे यांनी सहकार पॅनलतर्फे निवडणूक लढवित शेतकरी विकास पॅनलचे गोपाळ भंगाळे यांचा ३१ मतांनी पराभव केला. माजी खासदार तथा दूध संघाचे माजी संचालक वसंतराव मोरे यांचे ते पुत्र आहेत.

मतदारसंघनिहाय निकाल
अमळनेर – अनिल पाटील (२४६) विजयी वि. स्मिता वाघ (१८४), भडगाव – रावसाहेब भोसले (२३३) विजयी वि. डॉ. संजीव पाटील (२००), भुसावळ – शामल झांबरे (२६३) विजयी वि. शालिनी ढाके (१६९), बोदवड – मधुकर राणे (२२०) विजयी वि. अ‍ॅड. रवींद्र पाटील (२१६), चाळीसगाव- पांडुरंग पाटील (२४७) विजयी वि. सुभाष पाटील (१८८), चोपडा – रोहित निकम (२६९) विजयी वि. इंदिराबाई पाटील (१६४), धरणगाव – संजय पवार (२६९) विजयी वि.वाल्मीक पाटील (१६७), एरंडोल – दगडू चौधऱी (२३०) विजयी वि. भागचंद जैन (२०५), जळगाव – गुलाबराव पाटील (२७५) विजयी वि. मालतीबाई महाजन (१६२), जामनेर- गिरीश महाजन (२७६) विजयी वि. दिनेश पाटील (१५८), मुक्ताईनगर – मंगेश चव्हाण (२५५) विजयी वि. मंदाकिनी खडसे (१७९), पारोळा – चिमणराव पाटील (२२७) विजयी वि. सतीश पाटील (२०८), रावेर – ठकसेन पाटील (२६६) विजयी वि. जगदीश बढे (१७०), यावल- नितीन चौधरी (२६०) विजयी वि. हेमराज चौधरी (१६८), विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग – अरविंद देशमुख (२५९) विजयी वि. विजय पाटील (१७९). अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग – संजय सावकारे (२७६) विजयी वि.श्रावण ब्रह्मे (१६१), इतर मागासवर्गः पराग मोरे (२३०) विजयी वि. गोपाळ भंगाळे (२०७), महिला राखीव – विजयी- छाया गुलाबराव देवकर (२३५), पूनम पाटील (२५७)

Story img Loader