लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : अलीकडेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बाबींचा आढावा घेत मार्गदर्शन केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे शनिवारपासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पक्षीय कामकाजाचा कुठलाही अंतर्भाव नाही. शनिवारी सायंकाळी नाशिकरोड येथे हिंद मजदूर सभेचा अमृत महोत्सवी सोहळा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. रविवारी पवार यांच्या हस्ते देवरगाव येथे आश्रमशाळा आणि वसतिगृहाचे भूमिपूजन होणार आहे.

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना आणि राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतरही राष्ट्रवादीने नाशिकवर विशेष लक्ष दिले आहे. खुद्द पवार यांनी अनेकदा दौरे करीत शेतकरी व सामान्यांशी नाळ जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे मतदार संघ राष्ट्रवादी लढविण्याची शक्यता आहे, त्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. केंद्रस्तरीय (बुथ) रचना बळकट करण्यासाठी प्रत्येक केंद्रात १० कार्यकर्त्यांची नियुक्तीची सूचना केली. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा नाशिक दौरा झाला. त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. पक्षाला बळकट करण्यासाठी केंद्रस्तरीय यंत्रणा प्रभावी करण्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भर आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा होत आहे. शनिवारी दुपारी हेलिकॉप्टरने त्यांचे भुजबळ नॉलेज सिटीच्या हेलिपॅडवर आगमन होणार आहे. दुपारी साडेचार वाजता ते नाशिकरोड येथील कार्यक्रमास रवाना होतील, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा – जळगाव : तलाठ्यासह कोतवाल लाच घेताना जाळ्यात

हिंद मजदूर सभेने यंदा ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त देशातील पहिला अमृतमहोत्सवी सोहळा शनिवारी प्रेसच्या नाशिकरोड जिमखाना येथे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मजदूर संघ ही हिंद मजदूर सभेशी संलग्न आहे. कार्यक्रमाला हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस हरभजनसिंग सिध्दू, खजिनदार जयवंतराव भोसले, महाराष्ट्राचे अध्यक्ष शंकरराव साळवी, संजय वढावकर, खासदार हेमंत गोडसे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या बाबतची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली. प्रत्येक राज्यात अमृत महोत्सवी कार्यक्रम होणार असून त्याची सुरुवात नाशिकहून होत आहे. समारोप नागपूर येथे होणार आहे.

हेही वाचा – नाशिक : सुरगाण्यात महाप्रसादातून ६० जणांना विषबाधा

दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिक तालुक्यातील देवरगाव येथे कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादीच्या आ. सरोज अहिरे यांचा हा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात आश्रमशाळा व वसतिगृहाच्या कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेना दुभंगल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले. सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्रलंबित आहे. राष्ट्रवादीने मध्यावधी निवडणुका लवकरच होतील हे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वाढते दौरे त्याचे निदर्शक ठरले आहेत.