लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: परदेशात वाहतूक नियमांचे वाहनधारकांकडून कटाक्षाने पालन केले जाते. तिथे वाहन चालक परवाना मिळविण्याचे नियमही कठोर असतात. प्रदीर्घ प्रशिक्षण आणि परीक्षा देऊन तिथे परवाना मिळतो. त्यामुळे तेथील रस्त्यांवरील रहदारी उत्तम प्रकारे चालते. वाहतूक पोलीस देखील नसतात. त्याच धर्तीवर देशातील, राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपली वाहन परवाना देण्याची प्रक्रिया देखील कठोर करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केले.

pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
nashik crime news
नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी

नाशिक फर्स्ट संस्थेच्या ‘चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क’मध्ये सुरक्षित वाहतुकीविषयी आजवर तब्बल दोन लाखहून अधिक नागरिकांना प्रशिक्षित करण्याचा टप्पा गाठण्यात आला आहे. या निमित्त फणसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विजय पाटील, नाशिक फर्स्ट संस्थेचे प्रमुख अभय कुलकर्णी, देवेंद्र बापट, सुरेश बापट उपस्थित होते.

आणखी वाचा-अत्याधुनिक नवजात शिशु रुग्णवाहिका धूळ खात पडून, दहा महिन्यांपासून वापराविना

कुठल्याही समस्येवर मूळापासून इलाज करण्याची गरज फणसाळकर यांनी मांडली. मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यावर निर्बंध आहेत. एकदा वापरता येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी आहे. पण बंदी असणारे फटाके वा प्लास्टिकच्या उत्पादनावर निर्बंध आणल्यास पुढील प्रश्नच निर्माण होणार नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कर्करोगापेक्षा जास्त मृत्यू अपघातात होतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई हा उपाय नाही. रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. दरवर्षी रेल्वे रुळ ओलांडताना साडेतीन ते चार हजार लोकांचा मृत्यू होतो. या संदर्भात जनजागृतीसाठी फलक आणि नियम असूनही त्याचे पालन होत नाही. वाहनधारकांची वेगळी मानसिकता नसते. या मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता आहे. ज्या दिवशी वाहतूक पोलिसांना दंडात्मक कारवाई करावी लागणार नाही, तो सुदिन ठरेल. सुरक्षित वाहतुकीच्या जनजागृतीसाठी नाशिक फर्स्ट संस्थेने चालविलेले कार्य कल्पवृक्षासारखे वृध्दिंगत व्हावे आणि ‘चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क’ची संकल्पना राज्यातील इतर भागात पोहवावी, अशी अपेक्षा फणसाळकर यांनी व्यक्त केली.

संस्थेचे प्रमुख अभय कुलकर्णी यांनी फणसाळकर यांच्या संकल्पनेतून चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क’ची उभारणी झाल्याचे नमूद केले. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातील योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.