प्रवीण झगडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शेतकऱ्यांसमोर नवे संकट

दुष्काळी वर्षांत भाजीपाल्याची आवक कमी होऊनही भाव गडगडत आहेत. गतवर्षी आवक जास्त असताना भाव मिळाले. यंदा विपरीत स्थिती असूनही फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, वांगी, भोपळा गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने आर्थिक अडचणी अधिकच वाढणार आहेत.

नवा कांदा बाजारात आल्यानंतर उन्हाळ कांद्याला मातीमोल भाव मिळाला. यामुळे जिल्ह्य़ात आंदोलनाचे सत्र सुरू आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती या भाजीपाल्याच्या प्रमुख बाजारपेठेत जिल्ह्य़ातील बहुतांश भाजीपाला या बाजारात विक्रीसाठी येतो. या बाजार समितीतून तो मुंबई, गुजरातसह इतरत्र पाठवला जातो. पावसाअभावी या वर्षी शेतीचे गणित विस्कटले. ज्या भागात काहीअंशी पाणी शिल्लक आहे, तेथील शेतकरी दुष्काळात शेती मालास भाव मिळेल या आशेने लागवड करीत आहेत. परंतु, त्यांचाही भ्रमनिरास झाल्याचे भाजीपाल्याच्या दरावरून लक्षात येते.

गतवर्षी पाऊसमान चांगले राहिल्याने भाजीपाल्याचे उत्पादन अधिक होते. तरी देखील भाव टिकून होते. या वर्षी आवक कमी असताना भाव घसरल्याची आकडेवारी आहे. देशांतर्गत बाजारात मागणी घटल्याने आणि शेजारील राष्ट्रांच्या सीमा बंद असल्याचा परिणाम शेतमालाचे भाव कमी होण्यात झाल्याचे बाजार समितीच्या नियमन विभागाचे रघुनाथ घोडके यांनी सांगितले. गतवर्षी पाकिस्तान, बांगलादेशसह देशांतर्गत मागणी जास्त होती. या वर्षी आवक सर्वसाधारण असूनही मालास मागणी कमी असल्याने बाजारभाव स्थिर असल्याचे बाजार समितीचे म्हणणे आहे.

आवक कमी असूनही भाव कमी मिळतो. यामुळे लागवडीचा खर्च अर्थात भांडवलही निघत नसल्याची व्यथा माडसांगवीच्या वामन पेखळे या शेतकऱ्याने व्यथा मांडली. पंढरीनाथ गवांडे यांनी तोच मुद्दा अधोरेखित केला. जिल्ह्य़ातील निम्म्याहून अधिक तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. शेकडो गाव-वाडय़ांमध्ये टँकरने पाणी द्यावे लागत आहे. या परिस्थितीत कृषिमालास भाव नसल्याने ग्रामीण भागातील अर्थचक्र कोलमडण्याच्या मार्गावर आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांना कृषिमालास चांगला भाव मिळण्याची अपेक्षा होती. ही अपेक्षा फोल ठरल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटत आहे.

घसरणीतील दर

गतवर्षीच्या तुलनेत नोव्हेबर-डिसेंबरच्या भाजीपाला दरात फारसा बदल झालेला नाही. फ्लॉवरच्या दरात प्रति क्विंटलला १४० रुपये, कोबी ७२०, टोमॅटो २६००, भोपळा २९०, कारले ७५०, वांगी २२५० रुपये घट झाली आहे. गतवर्षी २३०० रुपये दर मिळवणारी हिरवी मिरची १८०० रुपयांवर आली आहे. मुळ्याच्या दरात ६००, गाजर दरात १३५० रुपयांचा फरक पडला आहे. पालेभाज्यांच्या दराची स्थिती वेगळी नाही. गतवर्षी कोथिंबिरीला  (१०० जुडय़ा) २८०० रुपये मिळालेला भाव यंदा ६०० रुपयांनी कमी होऊन २२०० रुपयांवर आला. मेथीच्या दरात ४०० रुपयांनी घसरण झाली. शेपू ४०० रुपये, कांदापात ४५०, पालक ३४०, पुदिन्याचे दर १५० रुपयांनी कमी झाले. केवळ भेंडीचे २५०० रुपये, दोडका २३०० हे दर कायम असून काकडीच्या दरात ३५० रुपयांनी तर डांगरच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली.