लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारी नवीन २१ चारचाकी वाहने पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात दाखल झाली. शहर पोलिसांची गस्त वाढण्यास यामुळे मदत मिळू शकेल. पोलीस आयुक्तालयात नवीन २१ वाहनांच्या ताफ्याला पालकमंत्री दादा भुसे यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव यांसह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पोलीस आयुक्तालयास चारचाकी वाहनांची अनेक वर्षांपासून निकड भासत होती. तत्कालीन आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी एका प्रस्तावाव्दारे १७ वाहनांची मागणी केली होती. विद्यमान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यात चारची भर टाकत २१ वाहने मिळावीत, यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीव्दारे पोलीस आयुक्तालयास मिळालेल्या निधीतून नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली. शहरातील १४ पोलीस ठाण्यांना तसेच गुन्हे शाखेला या वाहनांचा उपयोग गस्तीसह तपास कामांसाठी होणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New vehicles entered in nashik police commissionerate mrj