नाशिक – नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दूर होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद करावी, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेना ठाकरे गटातर्फे इगतपुरी तालुक्यातील घोटी टोल नाक्यावर धडक देण्यात आली. तासभर केलेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी शिवसैनिकांनी अनेक वाहने विना टोल सोडून दिली. वाहतूक खोळंबल्याने आंदोलक आणि वाहनधारकांमध्ये वाद झाले. अखेर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने ३१ जुलैपर्यंत रस्ते सुस्थितीत आणले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा >>> नाशिक: सर्प दंश मुळे बालकाचा मृत्यू

maharashtra vidhan sabha election 2024 aditya thackeray milind deora sandeep deshpande worli assembly constituency
लक्षवेधी लढत : आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याची खेळी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
maharashtra assembly election 2024 there is no election campaign tour of aditya thackeray in thane district
ठाणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा प्रचार दौराच नाही
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाने दोन, तीन आठवड्यांपासून आंदोलनाचे सत्र आरंभले आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेक महिन्यांपासून गाजत आहे. पावसाळ्यात महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने यात भर पडली. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने रस्ते दुरुस्तीकडे प्राधिकरणाचे लक्ष वेधले होते. परंतु, महामार्गाच्या स्थितीत सुधारणा न झाल्याने मंगळवारी खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी घोटी टोल नाक्यावर निदर्शने केली. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. एक ते दीड तास हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. दुरावस्थेमुळे नाशिक-मुंबई महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून कित्येकांना गंभीर दुखापत झाली आहे. काहींना प्राण गमवावे लागले, या सर्व घटनांना महामार्ग विकास प्राधिकरणचे प्रशासन व अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. १५ दिवसांत रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करावी आणि तोपर्यंत टोल वसुली करु नये, असा आग्रह आंदोलकांनी धरला.

हेही वाचा >>> पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

प्राधिकरणाने अपघातांची जबाबदारी स्वीकारून मयतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, जखमींवर उपचारांची व्यवस्था करावी, नवीन रस्ते विकसित करतांना मक्तेदाराचा खर्च, टोल स्वरुपात मिळालेले उत्पन्न याचे आकडे जाहीर करावेत, प्राधिकरण व मक्तेदाराची जबाबदारी असताना कर्तव्यात कसूर करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून काढण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर अनेक उड्डाणपूल बांधले जात असून जिथे वाहतूक वळवली गेली, तिथे सेवा रस्ता चांगला ठेवण्याची जबाबदारी मक्तेदाराची व संबंधित अधिकाऱ्यांची असते. परंतु, उड्डाणपूलाचे बांधकाम सुरु असलेल्या एकाही ठिकाणी सेवा रस्ता योग्य नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. या परिस्थितीमुळे नाशिक ते मुंबई अंतर कापण्यास आठ ते १० तासांचा वेळ लागतो, याकडे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनामुळे टोल नाक्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आंदोलकांनी काही वाहने विना टोल सोडून दिली. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्यामुळे वाहनधारक त्रस्तावले. त्यांचेही आंदोलकांशी वाद झाले.

घोटी ते पिंपरी सदो दरम्यान अपघातप्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी उड्डाण पुलांचे काम सुरू आहे. तेथील सेवा रस्ते पावसामुळे खराब झाले असून तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करून वाहतूक सुरू आहे. पावसाची उघडीप मिळताच १० ते १५ दिवसांत रस्ते दुरुस्त केले जातील. ३१ जुलैपर्यंत रस्ता सुस्थितीत आणला जाईल. – बी. एस. साळुंखे (महाव्यवस्थापक- तांत्रिक, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण)