नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिसभा व विद्यार्थी परिषदेवर नऊ विद्यार्थ्यांची बिनविरोध निवड झाली. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) माधुरी कानिटकर , प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी डॉ. निकुंभ यांनी, विद्यार्थ्यांच्या अडचणी विहित मार्गाने सोडविण्यासाठी प्रतिनिधींनी प्रयत्नशील राहावे, असे सांगितले. कुलसचिव डॉ. बंगाळ यांनी, अमरावतीच्या विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयातील इप्पर बालाजी, नाशिक येथील आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयातील सदाकांत राठोड आणि कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालयातील श्रीतेज हिरगुडे या तीन सदस्यांची विद्यापीठाच्या अधिसभेवर बिनविरोध निवड झाली असल्याचे सांगितले.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
loksatta lokankika Mumbai thane
महाविद्यालयांत तालमींचा कल्ला! ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई, ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी युवा रंगकर्मींचा कसून सराव
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
pralhad iyengar mit suspended
एमआयटीने निबंधावरून भारतीय विद्यार्थ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? कोण आहे प्रल्हाद अय्यंगार?
anoushka kale cambridge
ऐतिहासिक केंब्रिज युनियनच्या अध्यक्षपदी भारतीय विद्यार्थिनीची निवड; कोण आहेत अनुष्का काळे?

हेही वाचा – नाशिक : ग्रामीण पोलिसांची ६० संशयितांविरुद्ध कारवाई

हेही वाचा – काश्यपीतील विसर्गात पुन्हा वाढ, दुष्काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाची मध्यस्थी; ग्रामस्थांची नरमाई

विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव आणि दोन सहसचिव निवडून देण्याची तरतूद आहे. यानुसार विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी नगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या आयुर्वेदिक महाविद्यालयातील धनंजय मडके यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष पदाकरीता नंदुरबारच्या के. डी. गावित कॉलेज ऑफ बी.एस्सी नर्सिंगचा अभिषेक धमके, छत्रपती संभाजी नगर येथील आनंद कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा चैतन्य मेश्राम तसेच सचिव पदाकरीता पुण्याच्या श्रीमती बकुळ तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन येथील नेहा दुर्गडे यांची, सहसचिव पदाकरीता छत्रपती संभाजी नगर येथील दक्षिण केसरी मुनी मिश्रीलालजी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज येथील स्नेहा इप्पर आणि सेवाग्राम येथील महात्मा गांधी मेडिकल सायन्सेस मेडिकल कॉलेज येथील दत्तात्रय क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Story img Loader