Shivsena vs NCP in Niphad Vidhan Sabha Election 2024 : निफाडमध्ये कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार होतं. २३ नोव्हेंबरच्या निकालात निफाडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप बनकर यांचा विजय झाला आहे. निफाड हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, निफाड मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील चांदोरी, पिंपळगांव बसवंत, रानवड, निफाड आणि सायखेडा ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. निफाड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो. २०२४ च्या निवडणुकीत दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम असा सामना या ठिकाणी बघायला मिळाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निफाड म्हणजे एकही पहाड नसलेलं गाव

निफाड अर्थात एक ही पहाड नसलेले. येथे निफाड सहकारी साखर कारखाना आहे .तसेच हे एक मध्य रेल्वेचे स्थानकही आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड येथे झाला. निफाड तालुक्यात लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. द्राक्ष व ऊस उत्पादनात तालुका अग्रेसर आहे. निफाड शहरात भरपूर तेल गिरण्या आहे. निफाड तालुक्यात निफाड, पिंपळगाव, लासलगाव व ओझर ही शहरे आहे तसेच ग्रामीण भाग देखील सुजलाम सुफलाम आहे. तालुक्यात ओझर येथे मिग विमानाचा (HAL) कारखाना आहे. तालुक्यात नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे, त्याला महाराष्ट्राचे भरतपूर असेही म्हणले जाते. तसेच गोदावरी नदीवर नांदूर मधमेश्वर धरण आहे. येथे कादवा व गोदावरी नद्यांचा संगम होतो.

निफाडमध्ये कादवा आणि विनता या दोन नद्यांचा संगम

निफाड शहरातून नासिक, छ.संभाजीनगर, चांदवड, सुरत व सिन्नर चहूबाजूंना जाण्यास राज्यमार्ग आहे. सध्या फक्त राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे नासिक व छ.संभाजी नगरला जोडणाऱ्या मार्गाचेच चौपदरीकरण झाले ले आहे. निफाड तालुक्यातील निफाड व लासलगाव कांदा व लसूण उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. निफाड तालुक्यास महाराष्ट्राचे कोलिफॉर्निया म्हणून ओळखले जाते. निफाड एक मोठी बाजारपेठ आहे.शहराचे नगरपंचायत कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. निफाड शहरास प्राचीन मंदिरांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ह्या वारशाचे जतन करण्याची गरज व आवश्यकता आहे. तसेच कादवा-विनता या दोन नद्यांचा येथे संगम होतो.

२००९ आणि २०१४ या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे अनिल कदम आमदार झाले होते. मात्र २०१९ मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी झाले आहेत. शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे दिलीप बनकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला

निफाडमध्ये २००९ ची निवडणूक कोण जिंकलं?

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत निफाडची लढत ही राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विरुद्ध शिवसेनेचे अनिल कदम यांच्यात झाली होती. अनिल कदम यांना ९० हजार ६५ मतं मिळाली आणि ते विजयी झाले. तर दिलीप बनकर यांना ५६ हजार ९२० मतं मिळाली. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

२०१४ मध्ये काय घडलं?

२०१४ मध्ये पुन्हा एकदा निफाडमध्ये दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम यांचा सामना झाला. ही लढत काँटे की टक्कर ठरली. कारण अनिल कदम यांना ७८ हजार १८६ मतं मिळाली तर दिलीप बनकर यांना ७४ हजार २६५ मतं मिळाली. अवघ्या ३ हजार ९२१ मतांनी कदम यांचा निसटता विजय झाला.

२०१९ ला काय घडलं?

दोन पराभवांचा वचपा दिलीप बनकर यांनी भरुन काढला. राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या बनकरांना २०१९ च्या निवडणुकीत ९६ हजार ३५४ मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या अनिल कदम यांना ७८ हजार ६८६ मतं मिळाली.

बनकर आता विधानसभेला काय करणार?

निफाड मध्ये दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम हा राजकीय संघर्ष आहेच या दोन आजी- माजी आमदारांची प्रतिष्ठा देखील पणाला लोकसभेला पणाला लागल्याचं दिसून आलं होतं.त्यामुळे भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे ही लढत न बघता थेट विधानसभेची रंगीत तालीम समजून दिलीप बनकर आणि अनिल कदम हे दोघे निफाड चा कौल हा आपापल्या उमेदवाराला देण्यासाठी मैदानात उतरले होते. यात भारती पवारांचा पराभव झाला. आता दिलीप बनकर विधानसभेला काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.