जळगाव – विकासकामे करण्यात दुर्लक्ष करीत असल्यामुळे आयुक्तांच्या बदलीसाठी महापालिकेतील सर्वपक्षीय सदस्य एकवटले आहेत. ५६ नगरसेवकांनी आयुक्तांच्या विरोधात अविश्वासाची हाक दिली असून, त्यासंदर्भात मंगळवारी विशेष महासभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
शहरातील रस्ते, गटार, कचरा, अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे डॉ. अश्विन सोनवणे यांनी महापालिकेसमोर साखळी उपोषण केले. विकासकामे करण्यात दुर्लक्ष करीत असल्यामुळे आयुक्तांची बदलीची मागणीही त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महापालिकेतील सत्ताधारी ठाकरे गटासह विरोधी भाजप, एमआयएम, शिंदे गटाचे मिळून ७२ पैकी ५६ सदस्यांनी आयुक्त डॉ. गायकवाड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला आहे. सदस्यांच्या सहमतीचे पत्र महापौर जयश्री महाजन यांना देण्यात आले. त्यावर भाजप २९, ठाकरे गट २२, शिंदे गट १३ व एमआयएमच्या दोन सदस्यांची स्वाक्षरी आहे.

हेही वाचा >>>सिन्नरला बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

प्रस्तावासंदर्भात विधितज्ज्ञांचेही मतही घेण्यात आले आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांविरोधात ९१ टक्के सदस्यांनी पत्र दिले आहे. महापालिकेत डॉ. प्रवीण गेडाम यांच्यावर २००६ मध्ये अविश्वास दाखल झाला होता. त्यांच्यानंतर अविश्वास ठराव येणार्या डॉ. गायकवाड या दुसर्या आयुक्त असणार आहेत.