नाशिक: जलवाहिनी जोडणी, गळती थांबविणे, पाणी पुरवठा वितरण प्रणालीतील दुरुस्ती कामे आणि विशिष्ट वीज उपकेंद्रातील कामासाठी बंद राहणारा वीज पुरवठा या कारणास्तव शनिवारी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शनिवारी वितरण प्रणालीशी संबंधित अनेक कामे हाती घेतली जाणार आहेत. गंगापूर धरण पंपिग केंद्रावरून महापालिकेच्या बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्रांना पाणी पुरवठा केला जातो. नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक १२ मधील नवीन जलधारा वसाहतीत २० लाख लिटर जलकुंभ बारा बंगला जलशुध्दीकरण केंंद्राशी जोडला जाणार आहे. गंगापूर धरणातून शहरात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ रस्ता भागातील पाणी गळती बंद करणे, शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रात वाहिनीवर मीटर बसविणे आणि इतरत्र पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील दुरुस्ती आदींचा समावेश आहे.

maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
nashik east vidhan sabha
नाशिक पूर्वमध्ये भाजप-शरद पवार गटात वाद; वाहनाची तोडफोड,…
supriya sule
‘बटेंगे तो कटेंगे’वरून भाजपमध्ये दुफळी, सुप्रिया सुळे यांचा दावा
Mallikarjun kharge nashik rally
“महायुतीचे सरकार विचारधारेवर नव्हे, खोक्यावर बनलेले”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
nashik vidhan sabha
नाशिक: एकाच दिवसात ३४९ गुन्हेगार हद्दपार
Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
nashik crime news
नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
Former BJP MP from Dindori Constituency Harishchandra Chavan passed away
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

हेही वाचा… चाळीसगाव पाटबंधारे विभागाच्या लाचखोर लिपिकाला अटक

तसेच मनपाच्या मुकणे पंपिंग केंद्रास महावितरणच्या रेमण्ड उपकेंद्राच्या एक्स्प्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ किलोवॉटचा वीज पुरवठा कार्यान्वित आहे. या केंद्रात विविध तपासणी, चाचण्या व अन्य कामे करण्यासाठी महावितरणने शनिवारी सकाली नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शनिवारी गंगापूर व मुकणे धरणातून दुरुस्ती व वीज पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे मनपाचे शहरातील सर्व जलशुध्दीकरण बंद राहणार आहेत. या कारणास्तव शनिवारी शहरात पाणी पुरवठा करणे शक्य होणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. शनिवारी संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद राहील. रविवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गळतीमुळे तीन प्रभागात कमी दाबाने पाणी

प्रभाग क्रमांक २३ मधील गांधीनगर जलकुंभातून ( क्रमांक एक) पाणी गळती सुरू आहे. त्याची दुरुस्ती व जलरोधकाचे काम तातडीने हाती घेण्यात येणारआहे. हे काम १५ ते २८ डिसेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या काळात या जलकुंभावरून ज्या भागास पाणी पुरवठा होतो, त्यांना पर्यायी व्यवस्थेने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या काळात उपरोक्त भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. नाशिक पूर्व विभागातील हा जलकुंभ आहे. दुरुस्ती व जलरोधक कामामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील शांती पार्क, अयोध्या नगर, समता नगर, टाकळी गाव, मातोश्रीनगर, पाडेकर गॅस, इंद्रप्रस्थ कॉलनी, प्रेरणा सोसायटी, आनंद नगर, इंदिरा गांधीनगर, इंदिरा गांधी झोपडपट्टी, समर्थ रामदास स्वामीनगर एक, दोन आणि तीन, समर्थ रामदास स्वामी मठ, जनता शाळा परीसर, गणेश कॉलनी, उपनगर परिसर, नाशिकरोड प्रभाग क्रमांक २० व २१ मधील जयभवानी रोड परीसर, सहाणे मळा, लवटेनगर एक आणि दोन, तोफखाना केंद्र रोड, जगताप मळा, तरण तलाव परीसर, चव्हाण मळा, फर्नांडिस वाडी, भालेराव मळा, जाचकनगर, नंदनवन कॉलनी, आवटेनगर, आडकेनगर या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.