जळगाव – जिल्ह्यात १३ तालुक्यांतील ८० ग्रामपंचायतींमध्ये ९३ सदस्य आणि एक थेट सरपंचाच्या रिक्त पदासाठी गुरुवारी मतदान होणार आहे. या दिवशी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टिकोनातून या दिवशीचे आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्याचे आदेश ग्रामपंचायत शाखेतर्फे देण्यात आले आहेत.
हेही वाचा – धुळे : आस्था संस्थेसह अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा; महापौरांची आयुक्तांना सूचना
गुरुवारी आठवडे बाजार भरणाऱ्या गावांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, हिवरा, पिंप्री, अकराऊत, राजुरा, रुईखेडा, सारोळा. जामनेर तालुक्यातील देवडसगाव, रामपूर. चाळीसगाव तालुक्यातील दसेगाव, वाघळी, बाणगाव, हातले, ओढरे, तामसवाडी, देशमुखवाडी, आडगाव, कृष्णनगर, धामणगाव, मांदुर्णे, दस्केबर्डी, पिंपळवाड निकुंभ. रावेर तालुक्यातील वाघोड, रसलपूर, रेंभोटा, तासखेडा, कोळोदा, उदळी खुर्द, निंभोरा बुद्रुक, कुसुंबे बुद्रुक, पिंप्री, ऐनपूर, पाडळे बुद्रुक, जळगाव तालुक्यातील कंडारी, धानवड, फुपणी, ममुराबाद. भुसावळ तालुक्यातील वाजोळा, खंडाळा. यावल तालुक्यातील बोरखेडा बुद्रुक, बोरावल खुर्द, मारूळ, पिंप्री, पिळोदे खुर्द, कासवा, आडगाव, चिंचोली, बामणोद, सांगवी बुद्रुक, दहिगाव. बोदवड तालुक्यातील करंजी. पारोळा तालुक्यातील तरडी, शिरसोद. धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, चोरगाव, पाष्टाने बुद्रुक, शेरी. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव खुर्द, लोहटार, माहिजी, शिंदाड, डोकलखेडा, कुर्हाड बुद्रुक, वडगाव बुद्रुक, सावे बुद्रुक, अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द, लोणसिम, ढेकू खुर्द, लोणचरम, म्हसले, ब्राह्मणे, मुंगसे, वावडे, नगाव खुद्रुक, खडके. चोपडा तालुक्यातील मजरेहोळ, गरताड, उमर्टी, अनवर्दे बुद्रुक, दोंदवाडे, हातेड बुद्रुक या गावांचा समावेश आहे.