नाशिक – शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या उड्डाण पुलाखालच्या भागात अनधिकृत विक्रेते तसेच अनधिकृत वाहनतळामुळे उड्डाणपुलाखाली विद्रुपीकरण होत आहे. रस्ता खराब झाल्याने अपघातदेखील होत आहे. त्यामुळे महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांनी एकत्रितपणे काम करून हे अतिक्रमण हटवावे. रस्त्याची सुधारणा व पुलाखालील भागात सुशोभिकरणाची कामे तातडीने करावी, अशी सूचना अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना केली.

भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी एनएचआयचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे उपायुक्त नितीन नेर, सहायक सुरेंद्र वाघ आदी उपस्थित होते. शहरातील उड्डाण पुलाखाली मुंबई नाका ते आडगाव नाका परिसरात अनधिकृत विक्रेते व वाहन तळामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी विक्रेत्यांकडून कचरा तिथेच टाकला जातो. त्यामुळे सुशोभिकरणाच्या कामाचे नुकसान होत असून परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण तातडीने दूर करावे, असे त्यांनी सूचित केले. उड्डाण पुलाखालील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करावी असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, शहरातील अंतर्गत रस्त्यांबरोबर महामार्ग व त्याला समांतर सेवा रस्त्यांवर खड्ड्यांमुळे बिकट स्थिती आहे. मुसळधार पाऊस झाला नसताना रस्त्यांची चाळणी होत आहे. महामार्गाप्रमाणे महापालिकेने अंतर्गत प्रमुख रस्ते व कॉलनी रस्त्यांवरील दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज मांडली जात आहे.

new water purification project, water purification Bhandup Complex, Mumbai,
मुंबई : भांडूप संकुलातील नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामला सुरुवात, जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपुष्टात
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
third bridge over Vashi Khadi, bridge Vashi Khadi open,
नवी मुंबई : वाशी खडीवरील तिसऱ्या पुलावरून आजपासू वाहतूक सुरू, टोलमुक्तीमुळे सततची वाहतूक कोंडी फुटली
Passengers upset, Kasara local time, Karjat local time,
शेवटच्या कसारा, कर्जत लोकलच्या वेळा बदलल्याने प्रवासी नाराज
Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
Anger among commuters over digging of new concrete road in Dombivli MIDC
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्याचे खोदकाम केल्याने प्रवाशांमध्ये संताप
Bhayander Metro, Kashigaon Station,
भाईंदर मेट्रोला विलंब होणार ? काशिगाव स्थानाकाच्या जागेअभावी प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता
Residents on the master list will have to pay a lower rate for more area MHADA Vice Presidents decision
‘मास्टर लिस्ट’वरील रहिवाशांना ज्यादा क्षेत्रफळासाठी कमी दर मोजावा लागणार! म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय

द्वारका, मुंबई नाका चौकांची रुंदी कमी करा

शहरातील विविध भागांना जोडणाऱ्या मुंबई नाका आणि द्वारका चौक परिसरात वाहनधारकांना कोंडीला सामोरे जावे लागते. यावर आजवर अनेक उपाययोजना केल्या गेल्या. परंतु, ही समस्या अद्याप सुटलेली नाही. मुंबई नाका चौकातील बेटाचा आकार इतका विस्तीर्ण आहे की, रस्त्याला कमी आणि बेटाला अधिक जागा दिली गेल्याचे दिसते. अभ्यास गटाच्या मदतीने मुंबई नाका व द्वारका चौकातील बेटांचा आकार कमी करावा. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना भुजबळ यांनी केली.