लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या संशयितावर नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई केली असून ६१,९०० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला.

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील अंमलदार समाधान वाजे, अजय देशमुख यांना एक जण सिन्नर फाट्यावरील मार्केट यार्डात नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांना माहिती दिल्यानंतर तपासी पथकाने सापळा रचला.

आणखी वाचा-नाशिकच्या ठकबाजाकडून नागपुरात गोशाळा उभारण्यासाठी तीन कोटी

सिन्नरफाटा- एकलहरा रोड येथील मार्केट यार्डच्या बाजूला एक जण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसले. त्याची तपासणी केली असता वेगवेगळ्या रंगाचा नायलॉन मांजा आढळून आला. संशयिताने त्याचे नाव देवेंद्र शिरसाठ असे सांगितले. देवेंद्र याला ताब्यात घेण्यात आले असून ६१,९०० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला.