नाशिक – दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दु:खात गेले हिशोब करतो आहे, किती राहिलेत डोईवर उन्हाळे याची अनुभूती शहरातील सिंहस्थ नगरात मायको फोरमच्या वास्तुत सुरू असलेले कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय सध्या घेत आहे. ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे यांच्या स्मृतींचा अमूल्य ठेवा जपणारे हे वाचनालय नव्या वास्तुत सुर्वे यांच्या संकल्पनेतील ‘माझे विद्यापीठ’ या अनोख्या प्रकल्पाने साकारण्याचे नियोजन आहे. तथापि, निधी उभारणी आणि तांत्रिक अडचणींची पूर्तता अशा अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे आव्हान वाचनालयासमोर आहे.

सुर्वे यांचा नाशिकमधील मायको फोरमच्या वाचनालयाशी परिचय आणि स्नेह वृध्दींगत झाल्यानंतर त्यांनी आपल्या साहित्य संपदेसह मिळालेले मानसन्मान, पुरस्कार वाचनालयाकडे सुपूर्द केले. यामध्ये पद्मश्री, मध्य प्रदेश सरकारकडून दिलेला कबीर पुरस्कार, साहित्य संमेलनाचे स्मृतीचिन्ह, कामगार साहित्य संमेलनातील सन्मान, महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेकडून झालेला सन्मान यांचा समावेश आहे. साहित्यप्रेमींना हा अमूल्य नजराणा पाहता यावा यासाठी वाचनालयाने कलादालन सुरू केले. मात्र सद्यस्थितीत मायको फोरममधील जागा कमी पडत असल्याने महापालिकेने स्वत:हून २००५ मध्ये कामटवाडे परिसरातील आम्रपाली लॉन्सजवळील जागा फोरमला दिली. काही वर्षांपूर्वी सिंहस्थ नगरातून वाचनालयाने आपला मुक्काम या वास्तुत हलवला. याठिकाणी सुर्वे यांच्या संकल्पनेतील ‘माझे विद्यापीठ’ हा अनोखा प्रकल्प आकारास आणण्याची विश्वस्तांची तयारी सुरू होती. महिला, युवक, कामगार वर्ग डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टिने विविध उपक्रमांची आखणी, या माध्यमातून करणे सुरू झाले. वाचनालयाच्या आवारात परिसरातील विद्यार्थ्यांसाठी छोटी अभ्यासिका, सुर्वे यांची संपूर्ण साहित्य संपदा एका छताखाली असल्याने शोध प्रबंधासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ग्रंथ, सांस्कृतिक भवन, संगणक शाळा, ग्रंथ विक्री प्रदर्शन, आदी उपक्रम या ठिकाणी सुरू होणार आहेत. यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे बहुमजली इमारतीसाठी प्रस्ताव पाठवला असून तो मंजूरही करण्यात आला आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक

हेही वाचा >>>‘नासुप्र’तील दस्तावेज चोरून प्लाॅट विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ११ आरोपींना अटक, काही अधिकारीही रडारवर

आता या प्रकल्पाला मूर्त रुप देण्याचे विश्वस्तांसमोर आव्हान आहे. राजाराम मोहन रॉय सामाजिक संस्थेकडून ५० लाखांची मदत करण्यात आली असून संस्थेची १५ लाखांची अनामत रक्कम आहे. याशिवाय राज्य शासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

वाचनालयाकडे अमूल्य ठेवा

शहरातील सिंहस्थ नगरात मायको फोरमच्या वास्तुत कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय आहे. ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे यांच्या स्मृतींचा अमूल्य ठेवा जपणारे हे वाचनालय नव्या वास्तुत नेण्याचे नियोजन आहे. सुर्वे यांच्या साहित्य संपदेसह पद्मश्री, मध्य प्रदेश सरकारकडून दिलेला कबीर पुरस्कार, साहित्य संमेलनाचे स्मृतीचिन्ह, कामगार साहित्य संमेलनातील सन्मान, महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेकडून झालेल्या सन्मानातील स्मृतीचिन्ह आदी सुर्वे यांचा ठेवा वाचनालयाकडे आहे.

कामटवाडे परिसरातील आम्रपाली लॉन्समागे महापालिकेने जागा मंजूर केली आहे. नगररचना विभागाने याबाबत आराखडा मंजूर केला असून लवकरच कामाला सुरूवात होईल. विश्वस्तांनी प्रत्येकी ५० हजार रुपये जमा केले आहेत. निधीची जमवाजमव सुरू आहे. लोकप्रतिनिधी, कामगार, महापालिका आदींकडूनही मदत मागण्यात येत आहे.- राजीव नाईक (सुर्वे वाचनालय)