शासकीय अधिकारी जेमतेमच काम करीत असल्याचे म्हटले जात असताना दिंडोरीचे गटविकास अधिकारी मात्र त्यास अपवाद ठरत असून संत तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीता’वर आधारित ‘रामधून’ ही अभिनव संकल्पना दिंडोरी तालुक्यात राबविण्यास गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी सुरुवात केली आहे. पूर्वी रामप्रहरी फिरणाऱ्या वासुदेवाप्रमाणेच गटविकास अधिकाऱ्यांसह कर्मचारी नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे.

शासकीय कार्यालय म्हटले की लवकर काम तर होणार नाहीच, शिवाय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून कामासाठी पैसे मागितले जाण्याची भीती ग्रामीण भागात अधिक असते. एखाद्या अधिकाऱ्याला भेटायचे म्हणजे स्थानिक पुढाऱ्याची मध्यस्थी करणे, कार्यालयात आल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांची ‘मर्जी’ सांभाळून अधिकाऱ्यांना भेटता येते. काम होणे न होणे ही नंतरची बाब, परंतु गावकीचा पुढारी आपण अधिकाऱ्याशी भेट घालवून दिल्याची फुशारकी गावात मारत फिरतो. हे सर्व चित्र बदलण्यासाठी आणि जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुकडोजी महाराजांची रामधून संकल्पना राबविण्याचा विचार गटविकास अधिकारी रोकडे यांनी केला. तातडीने त्याची अंमलबजावणी करत दिंडोरी तालुक्यातील तळ्याचा पाडा येथे ग्रामपंचायतीमध्ये मुक्कामदेखील ठोकला.
सायंकाळच्या सुमारास स्थानिक मजूर, शेतकरी यांच्याशी चर्चा करून सकाळच्या रामप्रहरी बाहेर पडत घरी शौचालय नसलेल्या २३ कुटुंबप्रमुखांसमवेत बैठक घेऊन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
पिण्याचे पाणी प्रत्येक गल्लीत घरोघरी पाणी पोहोचते का, किती पाणी वाया जाते, नळांना तोटय़ा आहेत काय, गटारी वाहत्या आहेत की तुंबल्या आहेत, पिण्याच्या पाण्यात जंतूनाशक पावडर टाकली आहे काय, हे सर्व रोकडे हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत जाणून घेत आहेत. गावातून फेरफटका मारताना त्यांना ग्रामस्थ आरोग्याबरोबरच अन्य गोष्टींशी संघर्ष करत असल्याचे दिसून आले.
बहुतांश ठिकाणी शोष खड्डे आणि या खड्डय़ांचे पाणी तेथील रोपवाटिकेला जात असल्याचे तळ्याचा पाडा येथे दिसून आल्याने या गावात जनजागृती योग्य प्रकारे केल्यास हे गाव जिल्ह्य़ात आदर्श होईल, याची त्यांना खात्री पटली.
ग्रामीण भागातील भौगोलिक रचना, नागरिकांची आर्थिक स्थिती, शासकीय योजनांविषयी असलेली अनभिज्ञता, अधिकाऱ्यांपुढे तक्रारी घेऊन जाताना येणाऱ्या अडचणी, याबाबत दर १५ दिवसांनी एका गावी मुक्काम करत ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, विभागप्रमुखासह अन्य शासकीय कर्मचाऱ्यांशी गटविकास अधिकारी चर्चा करीत आहेत.
याद्वारे त्या त्या गावांतील अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर काय उपाययोजना केली जाऊ शकते, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्परता दाखविण्याबाबत काय करता येऊ शकते, याविषयी चर्चा होत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांविषयी असलेली उदासीनता कमी होण्यास मदत होऊ लागली आहे.

Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांत ‘या’ सुविधा देणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
Image of FASTag logo
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय
Kalyan Dombivli municipal limits, illegal buildings in Kalyan Dombivli ,
कडोंमपामधील ५८ बेकायदा इमारतींना तूर्त दिलासा, महापालिकेच्या तोडकाम कारवाईला उच्च न्यायालयाची तूर्त अंतरिम स्थगिती

दिंडोरीचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे हे सहकाऱ्यांसह तळ्याचा पाडा या गावात रामप्रहरी ग्रामस्थांच्या घरी भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेताना.

Story img Loader