लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जळगाव: अमळनेर शहरानजीक अवघ्या दोन-तीन किलोमीटरवरील चोपडा रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव मोटार पुलाचे लोखंडी कठडे तोडत थेट वीस-पंचवीस फूट खोल नाल्यात कोसळली. ही घटना रविवारी सकाळी घडली.

आणखी वाचा-नाशिक: उच्च शिक्षितांचा पोलीस उपनिरीक्षक पदाकडे ओढा

अमळनेर- चोपडा मार्गावरील अंबाऋषी महाराज टेकडीजवळ नाल्यावर लहान पूल आहे. रविवारी या पुलावरून मोटार जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि लोखंडी कठडे तोडून पुलाच्या खाली मोटार कोसळली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शहरासह परिसरातील रहिवाशांनी अपघातस्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यासाठी परिसरातील रहिवाशांनीही सहकार्य केले. पोलिसांकडून चौकशी केली जात असून, पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी अमळनेर येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.